मुंबई: शहरातील वांद्रे परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने येथे भीषण आग लागली. या आगीत ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलेंडरला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

अपघातात पाच जण जखमी झाले

वांद्रे येथील गजधर डॅम रोडवरील फिटर गल्लीमध्ये ही दुर्घटना झाला आहे. येथे अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. १८ नोव्हेंबर, शनिवारी म्हणजेच आज सकाळी ६.१९ वाजता हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून सारा परिसर हादरला. सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्यास सुरुवात केली. सकाळी ७.१५ वाजता आग आटोक्यात आणण्यात आली.

भायखळाच्या मदनपुरा भागात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी, ५ जणांना वाचवण्यात यश
या अपघातात एकूण पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व जखमींना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर येथील डॉक्टर उपचार करत आहेत.

जखमींमध्ये ५३ वर्षीय निखिल जोगेश दास, ३८ वर्षीय राकेश रामजनम शर्मा, ६५ वर्षीय अँटोनी पॉल थेंगल, ५४ वर्षीय कालीचरण मजीलाल कन्नौजिया आणि ३१ वर्षीय शान अली झाकीर अली सिद्दीकी यांचा समावेश आहे.

कचरा समजून फेकणार होती, तो १३ व्या शतकातील खजिना निघाला, किंमत २०८ कोटी रुपये
Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *