नवी दिल्ली : KYC अपडेट न केल्यामुळे तुमचे बँक खाते फ्रीज किंवा सक्रिय केले गेले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजच्या काळात प्रत्येकाकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. अशा परिस्थितीत सर्व योग्य पद्धतीने व्यवस्थापित करणे कठीण होऊन बसते. आरबीआय देखील वेळोवेळी बँक खात्यांबाबत अपडेट जारी करते. अलीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पुन्हा एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे ज्यानुसार तुमचे बँक खाते आहे, पण तुम्ही तिचे KYC पूर्ण केले नसेल, तर तुमचे खाते निलंबित (सस्पेंड) केले जाऊ शकते.

विशेष म्हणजे KYC अपडेट न केल्यामुळे खाते निष्क्रिय होण्यापासून ते परतावा आणि व्यवहारांपर्यंत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत तुमचे बँक खाते निलंबित झाल्यास तुम्ही काय करावे ते खालीलप्रमाणे जाणून घेऊया. लक्षात घ्या की KYC प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांसाठी वेगळी असते. उदाहरणार्थ उच्च जोखीम असलेल्या ग्राहकांना दर दोन वर्षांनी तर मध्यम जोखमीच्या ग्राहकांना दर ८ वर्षांनी आणि कमी जोखमीच्या ग्राहकांना १० वर्षांतून एकदा केवायसी करणं आवश्यक आहे.

बँक खातेधारकासाठी का महत्वाचे असते नॉमिनीची नोंद; एक चुक ठरू शकते कुटूंबासांठी मोठी अडचण
बँक खाते पुन्हा सक्रिय कसे करायचे?
रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार सध्याच्या कोणत्याही बँक ग्राहकाकडे पॅन, फॉर्म ६० किंवा बँकेत जमा केलेले कोणतेही कागदपत्र नसल्यास त्यांचे खाते सस्पेंड केले जाईल. तथापि, तुम्ही KYC मुळे निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय देखील करू शकता. KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे तुमचे बँक खाते निष्क्रिय (बंद) केले जाऊ शकते. तथापि तुम्ही ते पुन्हा सक्रियही करू शकता. रिझर्व बँकेनुसार खाते पुन्हा सक्रिय करण्याची प्रक्रिया सर्व बँकांमध्ये सारखीच असून तुम्ही तुमचे खाते कसे सक्रिय करू शकता ते समजून घेतले पाहिजे. तुम्ही तुमचे बँक खाते तीन प्रकारे सक्रिय करू शकता. तुम्हाला या तीनपैकी एका मार्गाने केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

अद्याप नाही आला इनकम टॅक्स रिफंड? बँक खातेशी संबंधित ‘हे’ काम केलं नसेल तर आयकर रिफंड विसरा

  • सर्वप्रथम, बँक ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या शाखेत जाऊन री-केवायसी फॉर्म आणि आवश्यक केवायसी दस्तऐवजाची एक प्रत सबमिट करावी लागेल.
  • एखाद्या वैयक्तिक निवासी ग्राहकाकडे आधार क्रमांक आणि मूळ पॅन कार्ड असल्यास तो व्हिडिओ कॉलद्वारे री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतो.
  • याशिवाय बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही ग्राहकाच्या KYC तपशिलांमध्ये कोणताही बदल नसल्यास तो ईमेल, पोस्ट आणि कुरिअरद्वारे मूळ स्वाक्षरीसह स्वयं-घोषणापत्र देखील पाठवू शकतो. असे केल्याने त्याची री-केवायसी प्रक्रियाही पूर्ण होईल.

घर किंवा कारसाठी कर्ज घेतले पण हप्ते थकले वा फेडता येत नसेल तर होऊ शकते नुकसान, जाणून घ्या
मोबाइल ॲपद्वारे री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना मोबाइल बँकिंग ॲपद्वारे री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्ही कोटक मोबाईल ॲपवर लॉग इन करा. क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला ‘Re KYC’ चा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडून तुम्ही OTP द्वारे तुमची री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि तुमचे खाते पुन्हा सक्रिय करू शकता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *