नवी दिल्ली : ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने (AIBEA) बँक कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान बँक कर्मचारी १३ दिवसांच्या संपावर जाणार आहेत. असोसिएशनच्या अधिसूचनेनुसार ४ डिसेंबर ते २० जानेवारी या कालावधीत विविध तारखांना कर्मचारी आपल्या विविध मागणीसाठी संप करणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांचा संप कधी आणि संपाचे कारण काय येथे समजून घेऊया.

बँक कर्मचाऱ्यांचा संप
पुढील महिन्यापासून जानेवारी २०२४ पर्यंत बँक कर्मचारी १३ दिवस वेगवेगळ्या दिवशी संप करणार असून भरती आणि आऊटसोर्सिंग बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या संपामुळे बँकांमधील कामकाज १३ दिवस प्रभावित राहील. AIBEA च्या स्ट्राइक प्लॅनमध्ये ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत विविध राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांमधील संपाचा समावेश आहे. यानंतर विविध राज्यांतील बँक कर्मचारी २ ते ६ जानेवारी या कालावधीत संपात सहभागी होतील. तर १९-२० जानेवारी २०२४ रोजी दोन दिवसांच्या अखिल भारतीय बँकर्सच्या संपाने त्याची सांगता होईल.

सणासुदीच्या दिवसांमध्ये कर्ज घेताय? मग आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच, नाहीतर हप्ते भरताना येतील नाकीनऊ
कोणत्या बँकेत कधी संप?
डिसेंबर ४ – PNB, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँक
५ डिसेंबर- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया
६ डिसेंबर- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया
७ डिसेंबर- इंडियन बँक आणि युको बँक
८ डिसेंबर- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र
११ डिसेंबर- खासगी बँकांचा संप

कर्जाचा हमीदार बनणे येऊ शकते अंगाशी, सह्या करण्याआधी घ्या खबरदारी; अन्यथा मोठ्या संकटात सापडाल

जानेवारीत सात दिवस संप

२ जानेवारी- तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये सर्व बँक कर्मचारी संपावर जातील.
३ जानेवारी- गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमध्ये बँक कर्मचारी संप पुकारतील .
४ जानेवारी- राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सर्व बँकांचा संप असेल.
५ जानेवारी- दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये सर्व बँका बंद राहतील.
६ जानेवारी- पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील सर्व बँकांचा संप.
१९ आणि २० जानेवारी- या दोन तारखांना देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जातील.

Five Day Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता… आठवड्यातून ५ दिवस कामासह मिळणार ‘एवढे’ टक्के वेतनवाढ
Read Latest Business News

ग्राहकांचे काय होणार?
बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपावर जाणार असल्यामुळे पुढील दोन महिने बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात बँक कर्मचारी सहा दिवस देशव्यापी संपावर जाणार असून सामान्य ग्राहकांना अनेक बँकिंग सेवेच्या बाबतीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *