पाच लाख घरांमध्ये उद्या येणार बाप्पा, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लगबग:पंढरपूर, बार्शी, माढा, मोहोळसह जिल्हाभरात स्वागताची जय्यत तयारी‎

पाच लाख घरांमध्ये उद्या येणार बाप्पा, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लगबग:पंढरपूर, बार्शी, माढा, मोहोळसह जिल्हाभरात स्वागताची जय्यत तयारी‎

विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे उद्या आगमन होत असून जिल्ह्यातील सुमारे पाच लाख घरात स्वागताची तयारी करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसत आहे. गावो गावी आणि पंढरपूर शहरातही जागो जागी गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे. दरम्यान पंढरपूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शांततामय गणेशोत्सवासाठी नियोजन केलेले आहे. यंदा नो डॉल्बी गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस प्रशासनाने बक्षीस ठेवले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गेले आठ – दहा दिवसांपासून गणेश मंडळांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. पंढरपूरच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. गौरी – गणपती च्या सजावटीसाठी इलेकट्रीक वस्तूंपासून हार, फुले, विविध खेळणी, गौरींचे मुखवटे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. बार्शी सार्वजनिक मंडळे 70 एक गाव एक गणपती 17 एकूण 87 माढा माढा शहर 10 ग्रामीण 54 एक गाव एक गणपती 11 एकूण 75 करमाळा शहर 21 ग्रामीण 104 एक गाव एक गणपती 16 एकूण 141 पंढरपूर शहर 145 ग्रामीण 110 मोहोळ 167 टेंभूर्णी ९६ गणेशोत्सव काळात शांतता राहावी यासाठी होमगार्ड आणि आर सी पी एफ, च्या तुकड्या मागवण्यात येणार आहेत. दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे. शिवाय रूट मार्च काढण्यात आलेला आहे. शहरातील गणेश मंडळांची बैठक बुधवारी पार पडलेली आहे. या बैठकीत गणेश मंडळांना मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. पोलिस बंदोबस्त वाढवला

​विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे उद्या आगमन होत असून जिल्ह्यातील सुमारे पाच लाख घरात स्वागताची तयारी करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसत आहे. गावो गावी आणि पंढरपूर शहरातही जागो जागी गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे. दरम्यान पंढरपूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शांततामय गणेशोत्सवासाठी नियोजन केलेले आहे. यंदा नो डॉल्बी गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस प्रशासनाने बक्षीस ठेवले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गेले आठ – दहा दिवसांपासून गणेश मंडळांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. पंढरपूरच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. गौरी – गणपती च्या सजावटीसाठी इलेकट्रीक वस्तूंपासून हार, फुले, विविध खेळणी, गौरींचे मुखवटे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. बार्शी सार्वजनिक मंडळे 70 एक गाव एक गणपती 17 एकूण 87 माढा माढा शहर 10 ग्रामीण 54 एक गाव एक गणपती 11 एकूण 75 करमाळा शहर 21 ग्रामीण 104 एक गाव एक गणपती 16 एकूण 141 पंढरपूर शहर 145 ग्रामीण 110 मोहोळ 167 टेंभूर्णी ९६ गणेशोत्सव काळात शांतता राहावी यासाठी होमगार्ड आणि आर सी पी एफ, च्या तुकड्या मागवण्यात येणार आहेत. दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे. शिवाय रूट मार्च काढण्यात आलेला आहे. शहरातील गणेश मंडळांची बैठक बुधवारी पार पडलेली आहे. या बैठकीत गणेश मंडळांना मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. पोलिस बंदोबस्त वाढवला  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment