नागपूर: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ते कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा आरोप केला आहे. राऊत यांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले, शिवसेना नेत्याने हे करून आपली विकृत मानसिकता दाखवली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २१ नोव्हेंबरला ब्लॉक; २ तास वाहतूक पूर्णत: बंद राहणार, जाणून घ्या सविस्तर…
नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या कुटुंबासह बाहेर गेले आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्या हॉटेलमध्ये कॅसिनो आणि रेस्टॉरंट शेजारी आहे. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केला आहे. पूर्ण फोटो ट्विट केल्यावर सगळं लक्षात येत आहे की त्यांच्या पत्नी, मुलगी सगळं परिवार दिसत आहे. त्यासाठी ही विकृत मानसिकता संपवली पाहिजे. येवढं द्वेष योग्य नाही. संजय राऊत यांनी केवळ टीका केली. राजकारणासाठी हे ट्विट केले.

कोकणातील तुळस गाव; तुळशी वृंदावनांची १५० ते २०० वर्षे जुनी परंपरा जपतात गावकरी

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, “संजय राऊत यांनी फोटो शेअर केला आहे, तो पूर्ण दाखवला असता, तर बावनकुळे यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी, नातवासह सर्वजण उपस्थित होते, असे समजले असते. मात्र राजकीय वैतागामुळे राऊत यांनी हे केले. यातून त्याने आपली विकृत मानसिकता दाखवली आहे. बावनकुळे यांनीही राऊत यांच्या वक्तव्यावर आपली बाजू मांडली आहे. बावनकुळे यांच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये बसले होते. बावनकुळे यांनी एक्स वर लिहिलं “मकाऊमध्ये मी माझ्या कुटुंबासमवेत ज्या हॉटेलमध्ये राहिलो तेच हे कॉम्प्लेक्स आहे. हॉटेलमध्ये तळमजल्यावर रेस्टॉरंट आणि कॅसिनो आहे! रात्रीच्या जेवणानंतर मी माझ्या कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो तेव्हा कोणीतरी तो फोटो काढला होता.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *