मुंबई : आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी रात्री भारतीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. रोहित शर्मा आणि इतर वरिष्ठ खेळाडू या दौऱ्याचा भाग नसतील कारण टीम इंडियाला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे आणि हे सर्व खेळाडू त्याच्या तयारीत व्यस्त असतील. हार्दिक पंड्याला नेतृत्वाची कमान देत बीसीसीआयने गेल्या एका वर्षात भारतीय टी-२० मधील सहाव्या कर्णधाराची निवड केली आहे.

वाचा – टीम इंडियात दाखल झाला धोकादायक फिनिशर; फिटनेसमध्ये विराटला टाकतो मागे

श्रीलंका दौऱ्यावर ‘गब्बर’ नेतृत्व
गेल्या वर्षी भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर असताना शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. यावेळी धवनकडे संघाची कमान देण्यात आली होती. या दौऱ्यावर भारताला टी-२० मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला होता.

कोहलीच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक
टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये टीम इंडिया शेवटचा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. कोहलीने स्पर्धेपूर्वीच या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पहिले दोन सामने हरल्याने संघ बाद फेरीतून स्पर्धेबाहेर पडला. पण टीम इंडियाने नंतरचे तीन सामने जिंकले.

वाचा – इंग्लंडचा दौरा सुरु होण्यापूर्वीच भारताला बसला मोठा धक्का, महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

रो’हिट’ युगाची सुरुवात
टी-२० विश्वचषकानंतर बीसीसीआयने रोहित शर्माची टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळल्या आणि प्रत्येक वेळी विरोधी संघाचा सफाया केला. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहितने टी-२० फॉरमॅटमध्ये एकही सामना गमावलेला नाही.

केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली, मात्र स्टार सलामीवीर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. राहुलने मालिकेतून माघार घेतल्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतची कर्णधारपदी नियुक्ती केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.