याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ” पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये २९ सप्टेंबरला वर्ल्ड कपचा सराव सामना हैदराबादला खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांना मैदानात परवानगी देण्यात येणार नाही. कारण हा सामना हैदराबाद येथे २९ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वी म्हणजेच २८ सप्टेंबरला हैदराबादमध्ये गणेश विसर्जन आणि मिलन उन नबी हे दोन्ही कार्यक्रम असणार आहे. मिलन उन नबीमध्ये जुलूस हा रात्री उशिरापर्यंत चालतो. त्याचबरोबर गणेश विसर्जनही रात्री जास्त वेळ चालू शकते. त्यामुळे या दोन्ही सार्वजनिक कार्यक्रमात स्थानिक पोलिस व्यस्त असतील. त्यामुळे त्यांना लगेच दुसऱ्याच दिवशी या सामन्याला सुरक्षा पुरवता येणार नाही. त्यामुळे या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय हैदराबाद क्रिकेट संघटनेने घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या सामन्याला मैदानात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. पण दोन्ही संघांना मैदानात येण्यासाठी मात्र सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.”
हैदराबादच्या चाहत्यांसाठी हा निर्णय जिव्हारी लागणारा असेल. कारण हा सामना सोडला तर हैदराबादमध्ये फक्त तीनच सामने होणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये भारताचा एकही सामना नाही.
आता पाकिस्तानच्या सामन्यालाही प्रेक्षकांना मैदानात जाता येणार नाही. त्यामुळे हैदराबादच्या चाहत्यांसाठी ही एक वाईट बातमी असेल.