कामामुळे आपल्याला दिवस कडक उन्हात जावे लागते. अशातच सूर्यप्रकाश, घाण आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याचे खूप नुकसान होते.पावसाळ्यात आर्द्रता इतकी जास्त असते की चेहरा चिकट दिसतो. आणि हिवाळा जवळ आल्यावर त्वचा खूप कोरडी होते, हे पाहून असे वाटते की चेहऱ्यावरील सर्व ओलावा आणि तेल हवामानामुळे शोषले जाते. प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक त्वचेच्या समस्या भिन्न असतात. पण तुम्ही तुमच्या आहारात अशा काही गोष्टी स्विकारु शकता. “तुम्ही जे खाता ते तुमचे व्यक्तीमत्व आहे” ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल. तुमच्या त्वचेच्या बाबतीत, हे पूर्णपणे सत्य आहे. आपण दररोज जे पदार्थ खातो त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स ज्यांना सुपरफूड देखील म्हणतात, तुम्हाला हवी असलेली त्वचा प्राप्त करण्यात मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते 8 सुपरफुड. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

एवोकॅडो

चमकदार त्वचेसाठी एवोकॅडो हा एक उत्तम पदार्थ आहे. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, ते आपली त्वचा हायड्रेटेड, लवचिक आणि मजबूत ठेवण्यास मदत करते. एवोकॅडो खराब झालेल्या त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यास आणि अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.

(वाचा :- दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितला रामबाण उपाय, एका आठवड्यात थांबेल केस गळणं)

​ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते, जे त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करतात. यामुळे, ब्लूबेरी त्वचेचे संरक्षण करण्यास आणि त्वचेच्या बरे होण्यास मदत करतात.

(वाचा :- या 7 गोष्टी त्वचेसाठी ठरतील ‘घातक विष’, या गोष्टी लगेच खाणे बंद करा)

लिंबू

लिंबू हे व्हिटॅमिन सी ने भरलेले असतात. यामुळे त्वचा निरोगी राहते. व्हिटॅमिन सी ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करते. हे कोलेजन पातळी वाढवण्यास देखील मदत करते. ज्यामुळे तुमची त्वचा यंग दिसते.

(वाचा :- पचनशक्ती बरोबरच ताकाचे आहेत अनेक बहुगुणी फायदे, त्वचा व केसांसाठी तर जणू अमृतच)

​पालक

पालक, तसेच इतर पालेभाज्या तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहेत. पालकमध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि के भरपूर असल्याने, ही भाजी तुमची त्वचा चमकदार, निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. पालकामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात, म्हणून आपल्या आहारात भाज्यांचा समावेश केल्याने आपल्या त्वचेचे संरक्षण देखील होईल.

(वाचा :- कारल्याचा रस चेहऱ्याला लावून पाहा, जाणून घ्या या कडू कारल्याचे औषधी फायदे)

​रताळे

रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीनची उच्च पातळी असते, जी एकदा खाल्ल्यानंतर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन ए निरोगी त्वचेच्या पेशींचे उत्पादन वाढवते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई देखील समृद्ध असतात. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.

( वाचा :- वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीतील वाटाल, बाबा रामदेव सांगितले हेल्दी त्वचेचे रहस्य)

मासे

मासांमध्ये ओमेगा 3 असते. यामुळे तुमची त्वचा उत्कृष्ट होण्यास मदत होतो. मासे खाल्ल्याने तुमची त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि सर्वोत्तम वाटू शकते. तुमच्या त्वचेला होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि ती तरुण दिसण्यासाठी मासे खा.

(वाचा :- नाभीचे आरोग्य आणि तुमचे सौंदर्य या गोष्टींचा आहे खूपच जवळचा संबंध, काचेसारख्या त्वचेसाठी घरीच करा हा उपाय)

हळद

हळद केवळ तुमच्या सामान्य आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठीही आश्चर्यकारक आहे. हळद नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून वापरली जाते. हळद त्वचेच्या पुनरुत्पादनास मदत करते.

(वाचा :- करिनाच्या सुंदर सौंदर्याचं रहस्य उघड, ऋजुता दिवेकरांनी सांगितले ‘हे’ घरगुती उपाय)

​मध

कच्च्या मधामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल देखील असतो. म्हणून, कच्च्या मधाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ स्वच्छ होतात आणि परिणामी, तुमच्या त्वचेची स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारते.

(वाचा :- काळेभोर लांब सडक केस हवे असतील तर हे 5 रामबाण उपाय ठरतील वरदान)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.