संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ:त्यांचा सुपडा साफ; फडणवीसांवर टीका करणाऱ्यांना स्वत:ची औकात कळली असेल – नारायण राणे
मी आधीपासून सांगत होती की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 20 च्या पुढे आमदार निवडून येणार नाही. त्यांचे 19 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांचा सुपडा साफ झाला आहे. त्यांनी आता मला महाराष्ट्रात तोंड दाखवू नये, अन् संजय राऊत यांना समोर आणू नये असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांना त्यांची औकात कळाली आहे. महायुतीची सत्ता आल्याने मी खूप खूश आहे. गेल्या 72 वर्षांमध्ये असा आनंद मला झाला नव्हता तो आता झाला. उद्धव ठाकरेंना दु:ख द्यायचे नाही नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे पूर्ण संपले आहे. त्यांना आज दु:ख झाले आहे. म्हणून त्यांच्यावर टीका करत अजून दु:ख देऊ नये असे मला वाटते. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष सत्तेवर आणला होता, यांनी पक्ष धुळीस मिळवला असा टोला राणेंनी लगावला आहे. मुलांसह केसरकरांना निवडून आणलं नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर न बोललेले बरं, शिवसेना जी संपली उद्धव ठाकरेंची झालेली अवस्था ह्यासाठी केवळ राऊत यांच्यामुळेच झाली आहे. जनता माझ्या बाजूने होती, मी दोन्ही मुलांना नाहीतर केसरकरांनाही निवडून आणले. 6 उमेदवार निवडून आणले माझ्या मतदारसंघातील 6 पैकी 6 मतदारसंघात आमचे उमेदवार विजयी झाले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, असे भाजपचे नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. नीतेश अन् नीलेश राणे यांना तिकीट दिली आणि योग्य नियोजन करत आशिर्वाद दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.