मुंबई: भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात सचिन तेंडुलकर सोबत जून एक व्यक्ती मैदानात दिसत होती, ते म्हणजे युनिसेफचे सदिच्छा दूत डेव्हिड बेकहॅम. डेव्हिड बेकहॅम एक जगप्रसिद्ध खेळाडू असून जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत. सध्या युनिसेफअंतर्गत बॅकहम भारतात आले आहेत आणि भारताच्या वर्ल्डकप २०२३ च्या सेमीफायनलमध्ये सचिन तेंडुलकरसोबत सामन्याचा आनंद लुटताना दिसले.

भारतातील मुले, किशोरवयीन मुले, समाजात बदल आणि नाविन्य आणणाऱ्या मुली आणि सामाजिक अडथळ्यांचा मुकाबला करत लिंग भेद कमी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण महिला यांना भेटण्यासाठी युनिसेफचे सदिच्छा दूत डेव्हिड बेकहॅम या आठवड्यात भारतात आले आहेत. त्यांच्या चार दिवसांच्या भेटी दरम्यान, पश्चिम भारतातील गुजरात राज्यासह, बेकहॅम यांनी भारत सरकारच्या सहकार्याने युनिसेफच्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून मुली आणि महिलांसाठी होणाच्या सकारात्मक बदलांचा अनुभव घेतला.

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात, बेकहॅम यांची भेट २१ वर्षीय रिंकू प्रविभाईशी झाली. तिचे वयाच्या 15 व्या वर्षीच लग्न ठरले होते. तिच्यावर शाळा सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. परंतु बालविवाहाच्या वाईट परिणामांबद्दल तिला युनिसेफच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या ‘तरुण मुलीं’च्या गटातून माहिती मिळाली. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने तिचे लग्न रद्द करण्यात आले आणि आज रिंकू स्थानिक महाविद्यालयात नर्स होण्याचे शिक्षण घेत आहे.

तसेच मुलांना शालेय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या आणि बालविवाह, बालमजुरीचा विरोध करण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या लोकांच्या, सरकारी अधिकारी आणि समाजिक कार्यकर्ते यांची बेकहॅम यांनी भेट घेतली.

युनिसेफचे सदिच्छा दूत डेव्हिड बेकहॅम म्हणाले की, “एका मुलीचा पिता या नात्याने, मी रिंकू आणि इतर तरुण मुलींना भेटून खूप प्रभावित झालो. लहान वयातच बदलासाठी त्या लढा देत आहेत आणि त्यांच्या भविष्याबद्दल आपले मत मांडत आहेत.” “शिक्षण पूर्ण करून आणि आपल्या क्षमतेचा वापर करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी रिंकू आदर्श आहे. या सर्व मुलींना भारत सरकार आणि युनिसेफच्या सहकार्याने सुरू असलेल्या कार्यक्रमांचा, त्यातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे,” बेकहॅम म्हणाले.

बेकहॅम यांनी गुजरात विद्यापीठातील विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटरमध्ये उद्यमशील तरुण आणि उद्योजकांची भेट घेतली. भारतातील मुलांसाठी अशा प्रकारचे हे पहिले केंद्र असून, विशेषत: मुलींच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी ते स्थापन केले गेले आहे. त्यामध्ये सत्तावीस वर्षांच्या शिखा शाहने कापड आणि फॅशनसाठी पर्यावरणपूरक, नैसर्गिक तंतू तयार करण्यासाठा कृषी क्षेत्रातील टाकावू पदार्थांचा पुनर्वापर करणारी अल्टमॅट नावाची कंपनी स्थापना केली आहे. या कंपनीने कृषी-कचरा आणि फॅशन प्रदूषण या दुहेरी समस्येचे निराकरण करण्यासाठी आपले पेटंट तंत्रज्ञान सर्वोच्च उत्पादन क्षमतेपैकी एक केले आहे.

युनिसेफ भारत सरकारसोबत मुलींच्या शिक्षणात आणि संधींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काम करते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्ये वाढतात आणि पुढच्या पिढीतील उद्योजक आणि नेते बनण्यास मदत होते.

अहमदाबादमध्ये, बेकहॅमने गुजरात युथ फोरमच्या मुलांशी भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी, एलिक्सिर आणि युनिसेफ यांच्या सहकार्यातून तरुणांमध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी या फोरमची स्थापना झाली होती. यावेळी 12 वर्षीय प्रथा वानार या तरुण क्रिकेटपटूशी बेकहॅम यांनी चर्चा केली. ती सहा वर्षांची असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि आता संघातील मुलांमध्ये ती एकमेव मुलगी आहे. त्यांनी 14 वर्षीय लेखिका आर्या चावडा हिची भेट घेतली. आर्याने तिचे पुस्तक आणि कला वंचित कर्करोग रुग्णांना अर्पण केले आहे.

“युनिसेफचे सद्भावना दूत डेव्हिड बेकहॅम यांची भारत भेट प्रत्येक मुलासाठी समान संधी आणि अधिकार याबाबत संदेशाचे महत्त्वं अधोरेखित करते. त्यांच्या भेटीमुळे सर्वांना, विशेषत: मुलींना सक्षम बनवण्याच्या समान संधींना पाठिंबा देण्याच्या युनिसेफच्या ध्येयाला बळकटी मिळली,” असे युनिसेफच्या भारताच्या प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे यांनी सांगितले. “युनिसेफ भारत सरकारला पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक मूल जगू शकेल, समृद्ध होऊ शकेल आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकेल. स्त्री-पुरुष समानतेचा विचार हा युनिसेफच्या भारतातील सर्व कार्याचा केंद्रबिंदू आहे,” त्या म्हणाल्या.

वानखेडेवर राष्ट्रगीताचे सूर, भारतीय प्रेक्षकांचा ‘हाय जोश’

कोविड-19 महामारीने दक्षिण आशियात लिंग असमानता वाढवली आहे. कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह यांच्यामध्ये वाढ झाली आहे. रोजगार कमी झाल्यामुळे मुली आणि महिलांवर परिणाम झाला असून त्यांना सामाजिक-आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

या भेटी दरम्यान, डेव्हिड बेकहॅम यांनी दिग्गज क्रिकेटपटू आणि दक्षिण आशियासाठी युनिसेफचे प्रादेशिक राजदूत सचिन तेंडुलकर यांच्यासोबत मुंबईत आयसीसी क्रिकेट वर्ड कप सेमीफायनलमध्ये सहभागी झाले. क्रिकेटच्या माध्यमातून मुली आणि महिलांना सक्षम करण्याचा संदेश देत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सह युनिसेफची भागीदारीनिमित्ताने दोन क्रीडा तारे आज एकत्र आले होते. त्यांनी प्रेक्षकांना जगातील सर्व मुली आणि मुलांसाठी खेळात आणि जीवनातील संधी मिळाव्यात म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्याचे- #बीएचॅम्पियन (#BeAChampion)- असे आवाहन केले.

“खेळाच्या माध्यमातून मुलांना समान संधी उपलब्ध होऊ शकतात, असा मला कायम दृढ विश्वास वाटतो. खेळामधून सहभाग वाढतो, लिंग भेदाची बंधन तुटून पडतात आणि मुलींना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी खेळ हे एक शक्तिशाली माध्यम बनू शकते,’’ असे बेकहॅम म्हणाले.

युनिसेफ बद्दल
जगातील सर्वात वंचित मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी युनिसेफ कठीण ठिकाणी काम करते. 190 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये, आम्ही प्रत्येक मुलासाठी, सर्वत्र, प्रत्येकासाठी एक चांगले जग तयार करण्यासाठी कार्य करतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *