वाल्मीक कराड कोठडीत असलेल्या बीड पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या:टोकाचे पाऊल का उचलले? दबाव होता का? तपासाकडे लागले लक्ष

वाल्मीक कराड कोठडीत असलेल्या बीड पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या:टोकाचे पाऊल का उचलले? दबाव होता का? तपासाकडे लागले लक्ष

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड सध्या बीड पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आता याच बीड पोलिसातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाले आहे. या पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या नेमकी का केली? त्याच्यावर कोणता दबा होता का? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या कर्मचाऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता पोलिस तपासात काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्हा हा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. बीड जिल्ह्यात राजकीय मंडळी यांनी पोलिस यांच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी होत असल्याचा आरोप राज्यभरातून नेते करत आहेत. यातच बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड हा पोलिसांच्या ताब्यात आहे. सीआयडी आणि पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून वाल्मीक कराडची सध्या चौकशी सुरू आहे. न्यायालयाच्या वतीने त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान तो बीड पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आता यात बीड पोलिसातील पोलिस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांची आत्महत्या आणि वाल्मीक कराड याचा काही संबंध आहे का? अशा चर्चा सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. कराड आणि पोलिसांच्या संबंधावरुन प्रश्चचिन्ह वाल्मीक कराड बीड जिल्ह्यामध्ये दहशत पसरत असल्याचा आरोप केला जात आहे. यातच वाल्मीक कराडला पोलिसांची देखील साथ असल्याचा देखील आरोप होत आहे. राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या एसटायटी मधील ज्या पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांचे वाल्मीक कराड सोबत संबंध असल्याचा आरोप केला गेला होता. तसे पुरावे देखील समोर आले होते. त्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्यांना या एसआयटी मधून काढण्यात आले. मात्र तरी देखील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे आणि वाल्मीक कराडचे जवळचे हितसंबंध असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment