संजय घारपुरे, मुंबई ः वर्ल्ड कप असो वा कोणतीही लढत, त्यात सामन्यापूर्वीच्या इतिहासाचा निकालावर परिणाम होत नाही, मात्र काय घडू शकते याचे संकेत नक्कीच मिळतात. वर्ल्ड कप वनडे क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलियातील अंतिम सामना दोन दिवसांवर आला. हा इतिहास, दोघांतील सामन्यांची आकडेवारी भारताच्या बाजूने आहे, पण त्याचवेळी धोका असल्याचेही दाखवत आहे.

आता हेच बघा गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियात एकूण १३ लढती झाल्या, त्यातील दहा भारतात झाल्या आहेत. भारतातील दहापैकी सात लढती भारताने जिंकल्या आहेत, ही बाबत नक्कीच आत्मविश्वास उंचावणारी आहे. एवढेच नव्हे तर प्रतिस्पर्ध्यातील वर्ल्ड कपमधील गेल्या चारपैकी तीन सामने भारताने जिंकले आहेत. या स्पर्धेतील आघाडीच्या सात फलंदाजांत भारताचे तिघे आहेत. अर्थातच ते विराट कोहली (७११), रोहित शर्मा (५५०) आणि श्रेयस अय्यर (५२६) आहेत. त्याचवेळी पहिल्या सात जणात असलेला डेव्हिड वॉर्नर (५२८) सहावा आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद शमी (२३) अव्वल आहे, तर जसप्रीत बुमरा (१८) चौथा आहे. याचवेळी अव्वल पाच गोलंदाजांत अॅडम झाम्पा (२२) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आता हा इतिहास सुखावणारा असला तरी काही धोकादायकही गोष्टी आहेत. ऑस्ट्रेलियाने सातवेळा वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली आहे, त्यात पाचवेळा फायनल जिंकली आहे. १९७५ आणि १९९६ वगळता त्यांनी एकदाही अंतिम लढत गमावलेली नाही. याचाच अर्थ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील त्यांचे यश ७१ टक्के आहे. भारत वर्ल्ड कपमध्ये तीन अंतिम लढती खेळला आहे, त्यात १९८३ आणि २०११मध्ये बाजी मारली, पण २००३ मध्ये हार पत्करावी लागली होती. त्याचाच अर्थ यशाची टक्केवारी ६७ टक्के.

CWC 2023 फायनलसाठी ‘एअर शो’ची तयारी, नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज

भारत आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपची एकच फायनल झाली. ती झाली होती २००३ च्या स्पर्धेत. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतास १२२ धावांनी हरवले होते. त्याहीपेक्षा ऑस्ट्रेलियाने गेल्या २७ वर्षांत एकही वर्ल्ड कप अंतिम लढत गमावलेली नाही. आकडेवारी तर चुरशीची लढतच सांगत आहे. प्रत्यक्ष काय होईल, याचे उत्तर रविवारीच मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *