अहमदाबाद: विश्वचषक २०२३ चा बहुप्रतीक्षित अंतिम सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना आज (१९ नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ऐतिहासिक सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सलग दुसऱ्या दिवशी सरावासाठी सहभागी झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोहलीने नेट सराव सत्रात भाग न घेतल्याने चाहते नाराज आहेत. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, अशी भीती लोकांना वाटत आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजी करताना क्रॅम्पची तक्रार केली होती. त्याचबरोबर महत्त्वाच्या सामन्यापूर्वी सराव सत्रातही तो सहभागी झालेला नाही. कोहलीने नेट सराव वगळल्याचे फार कमी वेळा पाहायला मिळाले आहे. भारतासाठी विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली राहिला आहे. विराट जर तंदुरुस्त आहे तर तो सराव सामन्यात सहभागी एक झाला नाही; असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

आता प्रश्न पडतो की तो अंतिम सामन्यात सहभागी होणार की नाही? किंग कोहली पूर्णपणे फिट आहे. निर्णायक सामन्यापूर्वी त्याला ताजेतवाने आणि फिट ठेवण्यासाठी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विराट कोहली सराव सत्रांमध्ये सराव करताना दिसला नाही.

ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी ‘रोहित सेना’ अहमदाबादमध्ये पोहोचली

सेमीफायनलमध्ये तळपली विराटची बॅट

१५ नोव्हेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने प्रभावी कामगिरी केली होती. संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण ११३ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो १०३.५४ च्या स्ट्राइक रेटने ११७ धावा करण्यात यशस्वी झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून नऊ चौकार आणि दोन उत्कृष्ट षटकार आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *