कोलकाता : पाकिस्तानचा संघ हा सामना सुरु होण्यापूर्वीच आता वर्ल्ड कपमधून आऊट झाला आहे. कारण सामना सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडने मोठा गेम केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा सामना सुरु होण्यापूर्वीच गेम ओव्हर झाला आहे.

पाकिस्तानच्या संघासाठी हा सामना सर्वात महत्वाचा आहे. कारण पाकिस्तानना फक्त हा सामना जिंकायचा नाही तर त्यांना रन रेटही न्यूझीलंडपेक्षा जास्त ठेवायचा आहे, तरच त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येणार आहे. पण आता सामना होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्यापूर्वी इंग्लंडने एक अशी गोष्ट केली आहे की, त्यामुळे पाकिस्तानचा मोठा गेम झाला आहे.

सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता पाकिस्तानच्या संघाला नवीन टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संघाने जर प्रथम फलंदाजी केली तर त्यांना २८७ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. पण जर पाकिस्तानची प्रथम गोलंदाजी आली तर काय होणार, याचे समीकरणही समोर आले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टॉसचे महत्व अधोरेखित झाले आहे. पाकिस्तानने टॉस जिंकला तर ते प्रथम फलंदाजीच स्विकारतील. पण जर इंग्लंडच्या संघाने टॉस जिंकला तर पाकिस्तानला प्रथम गोलंदाजी करावी लागू शकते. या परिस्थितीत पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचणे अवघड जाऊ शकते. कारण जर पाकिस्तानची या सामन्यात प्रथम गोलंदाजी आली तर त्यांना इंग्लंडच्या संघाला २८४ चेंडू राखून ऑल आऊट करावे लागेल. या गोष्टीचा अर्थ असा होतो की, पाकिस्तानला इंग्लंडला ऑल आऊट करण्यासाठी फक्त १६ चेंडू मिळतील. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही अवघड गोष्ट समजली जात आहे. इंग्लंडने या सामन्यात टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यातच जमा आहे. कारण त्यांना १६ चेंडूंत इंग्लंडला काही ऑल आऊट करता येणार नाही. त्यामुळे आता पाकिस्तानच्या संघाचा गेम ओव्हर झाला आहे, असे म्हटले जात आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती आयसीसीने दिलेली नाही.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली असती तर त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी होती. पण आता त्यांची प्रथम गोलंदाजी असणार आहे. त्यामुळे त्यांचा आता मोठा गेम झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ सामान जिंकला तरी त्याचा काही फरक पडणार नाही. कारण ते वर्ल्ड कपच्या बाहेर गेले असल्याचे दिसत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *