लाडक्या बहिणींनंतर लाडक्या भावांचीही चांदी:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांना 10 सप्टेंबरपर्यंत मिळणार पैसे -लोढा
लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांना देखील मदतीसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून जवळपास 1 लाख 10 हजार प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहते. यापैकी 60 हजारांहून अधिक युवा खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. या संदर्भातील माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. मंगल प्रभात लोढा म्हणाले, आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून यातील 8 हजार 170 आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्णयानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रुजू झालेल्या युवकांना डीबीटीद्वारे विद्यावेतन 10 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजनेबाबत अधिक माहिती देताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, भविष्यातील रोजगाराची आव्हाने लक्षात घेता आतापासूनच कार्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून युवकांना रोजगारक्षम बनवण्याचा निर्धार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, या योजनेतून सरकारी तसेच खाजगी आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या योजनेत जवळपास 2 लाख 244 युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. 10 लाख युवकांना मिळणार प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे केवळ रोजगारच नव्हे तर उद्योगांना देखील लागणारे मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. ही योजना वर्षभर सुरू राहणार असून यातून 10 लाख युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.