113 वर्षांपासून साजरा होतोय नागपुरातील बंगाली दुर्गोत्सव:युद्धबंदी म्हणून नागपुरात आणण्यात आलेले सरदार दुर्लभराम यांची पहिले बंगाली म्हणून नोंद
१७५० मध्ये ओदिशातून बेंगाली सरदार दुर्लभराम यांना युद्धबंदी म्हणून नागपुरात आणण्यात आले होते. नागपुरात येणारे पहिले बेंगाली म्हणून त्यांची नोंेद आहे. त्यानंतर १६१ वर्षांनंतर म्हणजे १९११ मध्ये नागपुरातील धंतोली भागातील पटवर्धन ग्राऊंडवर बेंगाली दुर्गोत्सव साजरा झाला. तत्कालीन भोसले राजे रघुजी यांनी त्याचे उद्घाटन केले होते. त्या नंतर १९१८ पासून आता असलेल्या शाळेत साजरा केला जात असल्याची माहिती बेंगाली मराठी शब्दकोशाच्या लेखिका आणि अभ्यासक मंदिरा गांगुली यांनी “दिव्य मराठी’ला दिली. बेंगालीकरीता दुर्गोत्सव हा आनंदाचा उत्सव असतो. सासरी गेलेली मुलगी मुलाबाळांसह माहेरी येते. बंगाली मान्यतेनुसार तिच्यासोबत गणेश, कार्तीकेय ही मुले आणि लक्ष्मी आणि सरस्वती या मुली असतात. म्हणून नवे कपडे घेणे, गोडधोड खाणेपिणे आणि आनंद साजरा केला जातो. जणू काही दिवाळीच असते असे गांगुली यांनी सांगितले. १७९३ ते १७९८ या कालावधीत राधाकांत मुन्शी हे भोसले राजाशी तहाची बोलणी करण्यासाठी आले होते. त्या नंतर १८५५ मध्ये येथील ब्रिटिश रेसीडेन्ट जाॅर्ज प्लाउडेन यांचे दिवाण म्हणून गोविंदचंद्र मुन्शी आले. त्याच दरम्यान श्रीनाथ चटोपाध्याय, समदत्त आदी बेंगालीही आले. १८७४ मध्ये बिपीनकृष्ण बाशु गव्हर्नमेेट अॅडव्होकेट म्हणून आले होते. त्यांच्या समवेत तेव्हा १०० बेंगाली होते. माॅरिस काॅलेज व नागपूर विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी बिपीनकृष्ण बाशू एक होते. इथून नागपुरच्या लोकजीवनात बंगाली रूजले. हिंदुंची घटस्थापना आश्विन शु. १ ला होते. यावर्षी गुरूवार ३ आॅक्टोबर रोजी घटस्थापना आहे. तर बेंगाली घटस्थापना षष्ठीला होते. यावर्षी षष्ठी ९ आॅक्टोबर रोजी आहे. त्या दिवशी रात्री बेंगाली दुर्गेची प्राणप्रतिष्ठा होईल. रात्रीला प्राणप्रतिष्ठा होण्यामागे प्रभू रामाची कथा सांगितली जाते. रावणाचा पराभव करण्यासाठी प्रभू रामचंद्राने देवीची पूजा करून तिला जागवले. पण, त्यावेळी देवीचा शयनकाल सुरू होता. रामाने देवीला अवेळी जागवले म्हणून तिची प्राणप्रतिष्ठा रात्री केली जाते अशी मान्यता असल्याचे मंदिरा गांगुली यांनी सांगितले. या पूजेला “अकाल बोधन’ असे म्हटले जाते. अकाल म्हणजे अवेळी आणि बोधन म्हणजे जागवणे असा अर्थ होतो. षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी व दशमीला विसर्जन केले जाते. धंतोलीतील दिनानाथ हायस्कूलच्या बंगाली दुर्गोत्सवाला ११३ वर्षे, मोतीबाग बंगाली दुर्गोत्सवाला ७५ वर्षे आणि बंगाली कल्चरल सोसायटी अंतर्गत सार्वजनिक दुर्गोत्सव, काटोल रोड येथे ६४ वर्षे पूर्ण झाली. सीपीडब्ल्यूडी काॅलनी, वसंत पंचमी मैदानात हा दुर्गोत्सव षष्ठी ऐवजी पंचमीला म्हणजे ८ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. विसर्जन रविवार १३ रोजी होईल.