नवी दिल्ली: Smart TV Sale:फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल ६ ऑगस्टपासून सुरू होणार असून यादरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये स्मार्ट टीव्ही देखील असेल. जर तुम्ही मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला टॉप ३ डील्सची माहिती देत आहोत. Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान, Blaupunkt, Mi, OnePlus वरील स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा सेल ६ ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यामुळे सेल सुरू झाल्यानंतर या किमती बदलू शकतात. .जाणून घेऊया डिटेल्स.

वाचा: Tecno Spark 9T चा पहिला सेल आज , खरेदीवर मिळणार ऑफ, या बजेट फोनमध्ये आहे ५०MP कॅमेरा

Blaupunkt 50-
inch ultra HD TV:

यात ५०-इंच स्क्रीन आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन ३८४० x २१६० आहे. TV ची किंमत ३१,९९९ रुपये आहे. डिव्हाइस Android 10 सह येते. यामध्ये ६० W स्पीकर आउटपुटसह असून ४ स्पीकर आहेत. तसेच 2 GB रॅम देण्यात आली आहे. याटीव्हीवर ११,००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर ग्राहकांना मिळविता येणार आहे.

वाचा: ४८ MP कॅमेरासह पॅक्ड Samsung Galaxy F22 ची किंमत झाली कमी, बजेट सेगमेंटमध्ये आहे बेस्ट पर्याय

Mi 4X 125.7 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV:

हा एक अल्ट्रा HD LED TV आहे. त्याची किंमत ४१,९९९ रुपये आहे. हे डिव्हाइस ५००० रुपयांच्या सवलतीसह ३०,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. यासोबत, १६९०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, उद्या ही किंमत बदलू शकते.

OnePlus U1S 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV
:

TV ची किंमत ४९,९९९ रुपये आहे. हे डिव्हाइस २४ टक्के डिस्काउंटसह खरेदी केले जाऊ शकते. ज्याची किंमत ३७,९९९ रुपये आहे. यासह, १६,९००० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध करून दिले जात आहे. विक्री सुरू झाल्यावर त्याच्या किंमतीतील देखील बदल होऊ शकतात.

वाचा: Smart TV Discount : अवघ्या ५ हजारात घरी न्या ४० इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीवी, खरेदीसाठी होतेय ग्राहकांची गर्दीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.