वाचा: Top Smartphones: ८ GB रॅम, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सची किंमत २० हजारांपेक्षा कमी, तुम्ही कोणता खरेदी करणार?
बीएसएनएलचा ३४७ रुपयांचा प्लान:
रिचार्ज प्लान इतर कंपन्यांना कठीण स्पर्धा देते. या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता दिली जाते. यासोबत दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा दिला जात आहे. म्हणजेच एकूण ११२ GB डेटा . अशा प्रकारे, जर आपण १ GB डेटाची किंमत काढली. तर, ती सुमारे ३ रुपये आहे. डेटा व्यतिरिक्त,प्लान अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस आणि गेमिंग सेवा देखील देते.
वाचा: Budget Smartphones: आकर्षक डिझाईन, जबरदस्त फीचर्स आणि बजेट किमतीत येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच
इतर कंपन्या काय ऑफर करत आहेत ?
इतर कंपन्यांशी तुलना केल्यास, रिलायन्स जिओ तुम्हाला ४७९ रुपयांमध्ये ५६ दिवसांची वैधता ऑफर करते. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ GB डेटा देखील मिळतो. जर तुम्ही एकूण डेटा पाहिला तर, तो ८४ GB होतो, जो BSNL प्लानपेक्षा २८ GB कमी आहे. जिओच्या ४७९ रुपयांच्या प्लानमध्ये कॉलिंग, एसएमएस आणि जिओ अॅप्स सबस्क्रिप्शन या सारखे बेनेफिट्स आहेत. Airtel बद्दल बोलायचे झाले तर, या किंमतीच्या रेंजमध्ये ३५९ रुपयांचा प्लान आहे. ज्यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज २ GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण डेटा ५६ GB होईल. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबतच १०० एसएमएस आणि प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन फ्री ट्रायल सारखे बेनेफिट्स दिले जात आहेत.