नवी दिल्ली: Long Validity Plans: रिलायन्स जिओकडे किमती आणि वैधतेनुसार रिचार्ज प्लान्सची मोठी लिस्ट आहे. ज्यांना थोडी अधिक व्हॅलिडिटी हवी आहे. पण, जास्त पैसे खर्च करायची इच्छा नाही. अशा युजर्ससाठी देखील कंपनी काही भन्नाट प्लान्स ऑफर करते. आज येथे आम्ही तुमच्यासोबत Jio च्या ८४ दिवसांच्या प्लान्सची लिस्ट शेयर करणार आहो. कंपनीच्या ८४ दिवसांच्या तीन स्वस्त प्लानपैकी ७९९ रुपयांचा प्लान हा सर्वात महाग आहे. प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा दिला जाईल. ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससह Jio अॅप्सचे विनामूल्य सदस्यत्व दिले जाते.

वाचा: International Yoga Day 2022: स्वतःच्या फिटनेसची घ्या काळजी, घरी आणा योगा मोडसह येणारे ‘हे’ स्वस्त स्मार्ट बँड्स

Jio चा ६६६ रुपयांचा प्लान:

या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. ८४ दिवसात तुम्हाला एकूण १२६ GB डेटा मिळेल. यासोबतच सर्व नेटवर्कवर दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जातात. तुम्हाला Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

वाचा: Smartphone Tips : स्लो स्मार्टफोनचे टेन्शन विसरा, स्पीड होणार सुपरफास्ट, फॉलो करा ‘या’ सोप्पी टिप्स

Jio चा ३९५ रुपयांचा प्लान:

हा कंपनीचा सर्वात स्वस्त ८४ दिवसांचा प्लान आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि एकूण १००० एसएमएससह एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान तुम्ही हा डेटा कधीही वापरू शकता. यासोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

तसेच, तुम्हाला याहून अधिक व्हॅलिडिटी देणारा प्लान हवा असेल तर रिलायन्स जिओकडे २,५४५ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधती ३३६ दिवस म्हणजेच जवळपास ११ महिने आहे. यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा यानुसार एकूण ५०४ जीबी डेटाचा फायदा मिळतो. डेली डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

वाचा: WhatsApp वर लपून छपून बाबू-शोना सोबत बोलता ? असे लपवा Secret Chats, कुणालाही कळणार नाही, पाहा ट्रिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.