वाचा: International Yoga Day 2022 : फिट राहायचे असेल तर पाहा जबरदस्त हेल्थ फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ स्मार्टवॉचची लिस्ट
Vivo T1 44W:
Vivo T1 44W Flipkart वरून १४,४९९ च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. ज्यांना कमी किमतीत जलद चार्जिंग हवे आहे त्यांच्यासाठी Vivo चा हा फोन एक उत्तम पर्याय आहे. नावाप्रमाणेच हा Vivo फोन 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. याशिवाय, या Vivo स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फुलएचडी एमोलेड डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, ४ जीबी रॅम, १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. फोनमध्ये ५० मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा आणि १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Realme C35:
Realme C35 मोठी बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि उत्तम डिझाइनसह येतो. फोनमध्ये ६.६ -इंचाचा फुलएचडी डिस्प्ले आहे. ज्यावर नॉच उपलब्ध आहे. C35 मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हँडसेटच्या मागील बाजूस ५०-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये octa-core Unisoc T616 प्रोसेसर आणि ६ GB पर्यंत RAM आहे. य स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी, 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme C35 स्मार्टफोन ११,९९९ रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme च्या ऑनलाइन स्टोअर आणि Flipkart व्यतिरिक्त, हा फोन देशभरातील रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.
Oppo K10:
Oppo ने भारतात आपला पहिला K-सिरीज फोन K10 लाँच असून Oppo K10 हा डिझाईन आणि कॅमेराच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहे. Oppo K10 स्मार्टफोनमध्ये Reno Glo डिझाइन देण्यात आले आहे. Oppo K10 मध्ये ५० मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये दोन रियर कॅमेरे देखील आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये १६-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी, ३३ W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.