
अक्षय कुमारसोबत त्याचा मुलगा आरव, भाची सिमर आणि त्याची बहीण अलका हिरानंदानी आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवन उपस्थित होते. सर्वांनी मंदिरात बाबा महाकालचं दर्शन घेतलं.

महाकालेश्वर मंदिरातील पुजारी पंडित आशिष शर्मा यांनी सांगितलं, की अक्षय कुमार आज त्याच्या वाढदिवशी बाबा महाकाल दरबारात आला होता. त्याने देवाकडे देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अक्षयने सांगितलं, की त्याने आपला देश सदैव पुढे जात राहो, देशाची प्रगती होवो अशी प्रार्थना केली. त्याशिवाय वाढदिवशी त्याने त्याच्या आगामी सिनेमा मिशन रानीगंजच्या यशासाठीही भगवान महाकालकडे प्रार्थना केली. आपल्या वाढदिवशी साक्षात भगवान महाकालचं दर्शन मिळावं यापेक्षा मोठी भेट कोणती असू शकत नाही, असंही तो म्हणाला.

अक्षय कुमारच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या OMG 2 या सिनेमाला नोटीस पाठवण्यात आली होती. हिंदूंना सेक्स एज्युकेशनबाबत जागरुक करण्यासाठी बाबा महाकालशी जोडून जो सिनेमा बनवण्यात आला, पण इतर धर्माच्या लोकांना या शिक्षणाबाबत जागरुक करण्यासाठी असा सिनेमा बनवला जाईल का असा सवाल करण्यात आला होता.
तर दुसरीकडे भगवान शिवजींना कचोरी खरेदी करताना दाखवण्यात आल्याबद्दल आणि महाकाल मंदिराच्या काही परंपरा चुकीच्या पद्धतीने सादर केल्याबाबत महाकाल मंदिराचे पुजारी पंडित महेश शर्मा यांनी आक्षेप घेत अभिनेता अक्षय कुमार आणि सिनेमाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवण्यात आली होती.