भाई जगताप निवडणूक आयोगाला म्हणाले कुत्रा:भाजपची पोलिसात तक्रार; आयोगाकडून 3 डिसेंबरला काँग्रेसच्या शिष्टमंडळाला भेटीचे निमंत्रण

भाई जगताप निवडणूक आयोगाला म्हणाले कुत्रा:भाजपची पोलिसात तक्रार; आयोगाकडून 3 डिसेंबरला काँग्रेसच्या शिष्टमंडळाला भेटीचे निमंत्रण

महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. शुक्रवारी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना जगताप म्हणाले – निवडणूक आयोग हा कुत्रा आहे, जो पंतप्रधान मोदींच्या बंगल्याबाहेर बसलेला असतो. दुर्दैवाने, लोकशाही बळकट करण्यासाठी निर्माण केलेल्या सर्व यंत्रणांचा वापर देशभर घोटाळे करण्यासाठी केला जात आहे. जगताप यांच्या वक्तव्यावर शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, हा घटनात्मक संस्थेचा अपमान आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. मी जगताप यांच्याविरोधात निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. जगताप यांचा माफी मागण्यास नकार, म्हणाले- जे काही बोललो ते बरोबर जगताप यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. जगताप म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या चापलुसीमुळे देशातील लोकशाही बदनाम झाली आहे. कुत्र्याच्या कमेंटवर ते म्हणाले, मी अजिबात माफी मागणार नाही. जर ते पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असतील तर मी जे बोललो ते बरोबर आहे. निवडणूक आयोग देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आहे, कोणाची सेवा करण्यासाठी नाही. मी माझ्या शब्दावर ठाम आहे. जगताप पुढे म्हणाले की, काँग्रेसने ईव्हीएम तंत्रज्ञान आणले कारण ते फ्रान्स आणि अमेरिकेत वापरले जात होते, पण 2009 नंतर त्याच्या वापराबाबत शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र निवडणूक निकालावर काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक आयोगाला पत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत गंभीर निष्काळजीपणाचा आरोप काँग्रेसने शुक्रवारीच केला. पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून वैयक्तिक सुनावणीची मागणी केली होती. काँग्रेसने पत्रात हे मुद्दे उपस्थित केले आहेत निवडणूक आयोग म्हणाले – आकडेवारीत तफावत नाही, काँग्रेस नेत्यांनी येऊन भेटावे मतदानाच्या आकड्यांमध्ये फेरफार केल्याच्या काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितले की, मतदानाच्या आकडेवारीत कोणतीही अनियमितता नाही. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला 3 डिसेंबरला भेटायला बोलावले आहे. संध्याकाळी 5 वाजताचा मतदानाचा डसटा आणि अंतिम मतदानाच्या डाटामधील फरकाबाबत, निवडणूक आयोगाने सांगितले की, पीठासीन अधिकारी मतदानाचा डाटा अपडेट करण्यापूर्वी मतदानाच्या समाप्तीशी संबंधित इतर आवश्यक कार्यवाही पूर्ण करतात. त्यामुळे मतदानाचा अंतिम डाटा उशिरा अपडेट होतो. महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित खालील बातमी देखील वाचा… शरद पवारांकडून पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह:म्हणाले – अखेरच्या 2 तासांतील टक्केवारी अत्यंत धक्कादायक, जनतेने उठाव करणे आवश्यक देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यासंबंधीची अस्वस्थता ती सर्व भागात दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निकालाबद्दल जनमत हे बाबा आढाव यांनी घेतलेल्या भूमिकेतून व्यक्त होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर दिसून आला. तो यापूर्वी कधीही बघितला नव्हता. स्थानिक पातळीवरील निवडणूक असतात, त्यामध्ये अशा तक्रारी कुठे न कुठे ऐकायला मिळतात. मात्र संपूर्ण राज्याची आणि देशाची निवडणूक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणा हातात घ्यायची, असे चित्र यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. असेच काही या निवडणुकीत महाराष्ट्रात घडले आहे आणि त्याचा परिणाम होऊन लोकांची अस्वस्थता वाढली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा… महाराष्ट्राच्या CM पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी:5 डिसेंबर रोजी 1 वाजता आझाद मैदानावर शपथविधी; BJPच्या ज्येष्ठ नेत्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षातील एका ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. या संदर्भात सर्व तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. पूर्ण बामती वाचा….

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment