भांडूपच्या शाळेत लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून 3 चिमुकलींची छेडछाड:शाळा प्रशासनाकडून पोलिसात न जाण्यासाठी दबाव पालकांचा आरोप
भांडुपमध्ये लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड केल्याची घटना घडली आहे. शाळेत योगासन शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थीनीनी याबद्दल माहिती दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 27 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेच्या तळघरात दोन अल्पवयीन विद्यार्थीनी योगा करत होत्या. यावेळी शाळेतील साफ-सफाई अन् लिफ्टचे काम पाहणाऱ्या वक्तीने त्यांची छेड काढली. या प्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलींनी आपल्या शिक्षकांकडे तक्रार केली. यानंतर घरी जात आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. दरम्यान बदलापूर घटनेनंतर ह्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तळघरात लावलेले सीसीटीव्ही चेक करण्यात आले. यामध्ये संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात लिफ्ट ही केवळ ग्राऊंड फ्लोवरपर्यंत असताना सफाई कर्मचारी तळघरात पडद्यामागे लपल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. शाळेकडून सहकार्य नाही, उलट पोलिसांत न जाण्यासाठी दबाव – पालक शाळेची बदनामी होईल या भीतीने शाळेकडून हे प्रकरण पोलिसांमध्ये जाऊ नये यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात आला. तर पालकांनी शाळेत जात सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली असता त्यांना शाळा प्रशासनाने सहकार्य केले नाही असा आरोप विद्यार्थीनीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. पोलिसांकडून संशयात आरोपीला अटक चिमुकल्यांच्या विनयभंगप्रकरणी भांडुप पोलिसांनी तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. यात भारतीय न्याय संहिता 74, 78 आणि POCSO 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवत संशयित आरोपीला अटक केली आहे.
मदरशात दहा वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक अत्याचार नांदेडयेथील वाघी रोड हस्सापूर येथे दार-ए-अरखांम नामक मदरशात धक्कादायक घटना घडली आहे. या मदरशात शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर वजिराबाद पोलिस ठाण्यात मौलानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडमध्ये अल्पवयीन भिक्षेकरी मुलीवर अत्याचार एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणाऱ्या तरूणाने वारंवार अत्याचार केल्याने ती 6 महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.