मुंबई: वानखेडे मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्डकप २०२३ मधील सेमीफायनल मॅच सुरू आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माने धमाकेदार सुरुवात करून दिली. त्याने फक्त २९ चेंडूत ४ षटकारांसह ४७ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर आणि विराट कोहली यांनी धावांची गती कमी न होता फलंदाजी केली. भारताने २२ षटकात १ बाद १५७ धावा केल्या. २३व्या षटकात टीम इंडियाला मोठा झटका बसला. सलामीवर शुभमन गिलला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. शुभमनला क्रॅम्प आल्याने तो फलंदाजी सोडून मैदानाबाहेर गेला. २३व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुभमन रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. जर शुभमन ठीक झाला तर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो मात्र अद्याप याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अपडेट आले नाहीत.