रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेतेपदी नियुक्त केलेल्या आमदार भास्कर जाधव यांच्यावर दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी निशाणा साधला आहे.भास्कर जाधव राष्ट्रवादीत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर संपत्ती बद्दल प्रश्न उपस्थित केला होता त्याचा दाखला देत योगेश कदम यांनी सवाल केला आहे. कदम यांनी त्याबाबत एक ट्विट केलं आहे. भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यांनंतर उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित करुन टीका केली होती. त्याचा संदर्भ देत भास्कर जाधव यांचा जुना व्हिडिओ योगेश कदम यांनी ट्विटरवर शेअर केला. आहे.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेनेचे नेते आहेत. तर, उद्धव ठाकरेंचं नेत्तृत्व मान्य नसणारे नेते एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. रामदास कदम आणि त्यांचा मुलगा योगेश कदम एकनाथ शिंदे गटात गेले आहेत.

उद्धव ठाकरेंनी राजन साळवी यांना उपनेटेपद तर भास्कर जाधव याना नेतेपद दिलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या दापोली येथील सभेत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती.

पोलीस लेकावर बडतर्फीची कारवाई, वडिलांचं धक्क्यानं निधन, कुटुंबीयांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या दापोली येथील जाहीर सभेत रामदास कदम यांनीही भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली होती. माझ्या नादाला लागू नका असा सज्जड इशारा त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आता भास्कर जाधव विरुद्ध रामदास कदम असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. योगेश कदम यांनी ट्विट करून भास्कर जाधव यांना विचारलेल्या सवालाला भास्कर जाधव कोणते उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

रोहित शर्मा या सामन्यात का करू शकला तुफानी फटकेबाजी, जाणून घ्या हे एकमेव कारण

भास्कर जाधव यांच्याकडून देखील कदम यांच्या गटाला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेते एकत्र असलेले नेते आपापआसात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. आता भास्कर जाधव आणि रामदास कदम, योगेश कदम असा सामना रंगतोय.

दिनेश कार्तिकच्या मनात अखेरच्या षटकात नेमकं काय सुरु होतं, ऐकाल तर वाटेल अभिमानSource link

Leave a Reply

Your email address will not be published.