भास्कर जाधवांच्या विधानाने चर्चांना उधाण:मविआत काँग्रेसच्या जास्त जागा अन् राष्ट्रवादीच्या स्ट्राइक रेटने उद्धव ठाकरे हे प्रेशर खाली
लोकसभा निवडणुकीत मविआत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्याने आणि शरद पवारांचा सर्वाधिक स्ट्राइक रेट असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोडेसे प्रेशर खाली आले आहेत असे दिसत आहे, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की, मी हे विधान जबाबदारीने केले आहे. माझ्यासाठी राजकीय दृष्ट्या हे अडचणीचे आहे. पण उद्धव ठाकरे यांनी प्रेशर खाली येण्याची गरज नाही. आज महाराष्ट्राला तुमच्या मुळेच महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या हे महाराष्ट्राला माहीत आहे. तुमच्यामुळेच या जागा मिळाल्या आहेत. नेमके भास्कर जाधवांचे वक्तव्य काय? भास्कर जाधव म्हणाले की, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेसची राज्यात एकही जागा नव्हती. बाळू धानोरकर हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते पण त्यांचे निधन झाले होते. तर पवारांच्या पक्षाचे 4 खासदार होते त्यापैकी 1 खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले त्यांच्याकडे 3 खासदार राहिले. उद्धव ठाकरेचे 18 खासदार असताना त्यांचे 12 खासदार शिंदेसोबत गेले तर 6 जणांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. यात 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत मविआत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्याने आणि शरद पवारांचा सर्वाधिक स्ट्राइक रेट असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोडेसे प्रेशर खाली आले आहेत असे दिसत आहे. काँग्रेसला दिला इशारा भास्कर जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरेंमुळेच मविआच्या 31 जागा मिळाल्या हे राज्यातील जनता जाणते. तुम्ही कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न नक्की करा पण कमीत कमी जागा घेण्याचा विचार करण्याचे काही कारण नाही. शेवटी 2019 मध्ये एक नंबरला आपला पक्ष होता. दोन नंबरला पवारांचा पक्ष होता आणि तीन नंबरला काँग्रेस होती. त्यामुळे काँग्रेसचे लोक 12 पैकी एकही जागा देणार नाही म्हणतात त्यांना नम्रपणे सांगतो की 2019 कोणीही विसरू नये, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. यामुळे आता काँग्रेस नेते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.