विकासवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणार:शरद पवार कोल्हापुरात असताना अजित पवारांची मोठी घोषणा

विकासवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणार:शरद पवार कोल्हापुरात असताना अजित पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज मंगळवारी रोजी कागल येथे भव्य कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुतारी हाती घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापुरात मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील विकासवाडी गावाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला क्रीडांगण उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार तथा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे शहरी भागासह ग्रामीण परिसरात देखील क्रीडा क्षेत्राला वलय प्राप्त होऊ लागले आहे. राज्यासह देश पातळीवर क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस क्रिकेट खेळाची लोकप्रियता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात क्रिकेट खेळाच्या विकासासाठी आणि सर्वोत्तम खेळाडू निर्माण करण्यासाठी दर्जेदार स्टेडियमची आवश्यकता आहे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, विकासवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या गट क्रमांक 110 व 111 मधील 12 हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी क्रीडा विभाग आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी या जागेबाबतचा अहवाल तातडीने संबंधित विभागांकडे पाठवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

​राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज मंगळवारी रोजी कागल येथे भव्य कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुतारी हाती घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापुरात मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील विकासवाडी गावाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला क्रीडांगण उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार तथा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे शहरी भागासह ग्रामीण परिसरात देखील क्रीडा क्षेत्राला वलय प्राप्त होऊ लागले आहे. राज्यासह देश पातळीवर क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस क्रिकेट खेळाची लोकप्रियता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात क्रिकेट खेळाच्या विकासासाठी आणि सर्वोत्तम खेळाडू निर्माण करण्यासाठी दर्जेदार स्टेडियमची आवश्यकता आहे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, विकासवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या गट क्रमांक 110 व 111 मधील 12 हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी क्रीडा विभाग आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी या जागेबाबतचा अहवाल तातडीने संबंधित विभागांकडे पाठवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment