मोठ्या शहरांत घरे 32% महागली:वाढत्या बांधकाम खर्चामुळे घरांचा पुरवठा कमी झाल्याचा परिणाम
या वर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान देशातील मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती ३२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. या काळात हैदराबादमध्ये घरे सर्वात महाग झाली. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म ॲनारॉकच्या अहवालानुसार, बांधकाम खर्च वाढणे आणि घरांचा कमी पुरवठा हे यामागील सर्वात मोठे कारण राहिले.
अहवालात म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यांत हैदराबादेतील घरांच्या किमती सर्वाधिक ३२ टक्क्यांनी वाढल्या. तथापि, कोलकाता येथे सरासरी घरांच्या किमती १४% आणि पुणे आणि चेन्नईमध्ये १६% वाढल्या आहेत. या कालावधीत, दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) आणि बंगळुरूमध्ये घरांच्या किमती सरासरी २९% वाढल्या. गेल्या तिमाहीत, देशातील टॉप-७ शहरांमधील घरांचा पुरवठा १९% ने घटून ९३,७५० युनिट्सवर आला, जो एका वर्षापूर्वी १.१६ लाख युनिट्स होता. मोठ्या शहरांमध्ये सरासरी किंमत २३% वाढली आहे. ॲनारॉकच्या अहवालानुसार, जुलै-सप्टेंबरदरम्यान देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती सरासरी २३% वाढल्या आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू आणि पुणे येथे या कालावधीत घरांची सरासरी किंमत रु. ६,८०० ते रु. ८,३९० प्रति चौरस फूट वाढली आहे.