मुंबई : भारताचा यष्टीरक्षक लोकेश राहुलने यावेळी एक मोठी चूक केली. त्यामुळे सेमी फायनलच्या सामन्यात भारताला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले आहे. या गोष्टीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.ही गोष्ट घडली ती १८ व्या षटकात. त्यावेळी भराताचा कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा फलंदाजी करत होता. यावेळी कुलदीपने चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. केनने हा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलावला. यावेळी आपण एक चोरटी धाव घेऊ असे केनला वाटले. त्यामुळे तो धाव घेण्यासाठी धावत सुटला. पण त्याच्या समोर उभा होता होता न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेल. ही धाव घेण्यास मिचेलने नकार दिला आणि त्याने केनला पुन्हा माघारी धाडले. तोपर्यंत केन अर्ध्या पीचपर्यंत आला होता. यावेळी माघारी फिरण्यात केनला उशिर झाला. त्यामुळे माघारी फिरत असताना केनचा वेग थोडासा सुरुवातीला मंदावला होता. त्यानंतर मात्र त्याने जोरात धाव घेतली. आपील विकेट वाचवण्यासाठी तो क्रीझच्या दिशेने धावत सुटला. त्यावेळी पॉइंटला उभ्या असलेल्या भारताच्या खेळाडूने चेंडू पकडला आणि थेट लोकेश राहुलच्या दिशेने फेकला. यावेळी केन बाद झाला असता. पण त्यावेळी राहुलकडून एक मोठी चूक घडली. हा चेंडू पकण्याच्या नादात राहुलकडून थोडी गडबड झाली. हा चेंडू पकडताना त्याचे ग्लोव्ह्ज आधी स्टम्पला लागले. त्यामुळे बेल्स पडल्या आणि त्यामुळे केनला जीवदान मिळाले. त्यावेळी केन हा २९ धावांवर खेळत होता. तेव्हा जर केन बाद झाला असताना तर भारताला न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलता आले असते. पण त्यानंतर केनने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि ६९ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळे हे राहुलने केनला दिलेले जीवदान सर्वात महाग पडले.केन हा मॅचविनर खेळाडू आहे आणि त्यामुळेच त्याला जे राहुलने जीवदान दिले ते चांगलेच भारताला महाग पडल्याचे पाहायला मिळाले. कारण केनने त्यानंतर डॅरिल मिचेलबरोबर मोठी भागीदारी रचली आणि भारताला विजयापासून थोडे लांब नेले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *