अहमदाबाद : विराट कोहलीने फायनलमध्ये दमदार अर्धशतक झळकावले. पण कोहलीकडून एक मोठी चूक घडली आणि त्यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला.फायनलमध्ये शुभमन गिल पाचव्या षटकात बाद झाला आणि विराट कोहली फलंदाजीला आला. विराट आण रोहित शर्मा ही सर्वात अनुभवी जोडी मैदानात खेळत होती. विराट आणि रोहित हे दोघेही धडाकेबाज फटकेबाजी करत होते. पण मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. त्यानंतर संघाची जबाबदारी कोहलीने आपल्या खांद्यावर घेतली. कोहलीने भारताचा डाव चांगलाच सावरला. कोहलीने यावेळी मोठे फटके मारून कोणतीही जोखीम घेतली नाही. कोहलीने एकेरी-दुहेरी धावांवर जास्त भर देत होता आणि डावाची उभारणी करत होता. रोहित बाद झाल्यावर श्रेयस अय्यरही लवकर बाद झाला आणि भारतीय ंसघावर दडपण वाढले. पण या सर्व दडपणातून कोहलीने संघाला बाहेर काढले. कोहलीला यावेळी साथ देण्यासाठी लोकेश राहुल मैदानात आला होता. राहुल आणि कोहली ही जोडी चांगलीच जमली होती. यापूर्वीही विराट आणि राहुल या जोडीने मोठी भागीदारी रचली होती. त्यामुळे ही ही जोडी भारताला मोठा धावसंख्या उभारून देईल, असे वाटत होते. कोहलीने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कोहली शतकाच्या समीप जाण्यासाठी आसूसला होता. त्यामुळे कोहली फायनलमध्ये शतक झळाकवून इतिहास रचणार, अशी चाहत्यांना आशा वाटत होते. पण पॅट कमिम्सच्या उसळत्या चेंडूचा बचाव करण्याच्या नादात कोहली क्लीन बोल्ड झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. कोहलीकडून यावेळी ही मोठी चूक घडली. कारण कोहली चांगलाच सेट झाला होता. खेळपट्टी संथ होती. त्यामुळे या खेळपट्टीवर नवीन फलंदाज लगेच सेट होऊ शकत नाही, हे सर्वांनाच माहिती होते. पण कोहलीने यावेळी उसळता चेंडू ढकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडून ही मोठी चूक घडली. कारण कोहली हा सेट झाला होता. या चेंडूवर तो हुक किंवा पुलचा फटका खेळू शकला असता. पण तसे कोहलीने केले नाही आणि तो बाद झाला. कोहलीच्या या चुकीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. कारण कोहली बाद झाल्यावर भारताची धावगती मंदावली.कोहलीने यावेळी अर्धशतक पूर्ण केले खरे. पण त्यानंतरही त्याच्याकडून एक चूक झाली आणि त्याचा फटका संघाच्या धावसंख्येवर झाल्याचे पाहायला मिळाले.