मोठी बातमी:लक्ष्मण हाके यांनी मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; मराठा तरुणांची हाकेंसमोर घोषणाबाजी
पुण्यात कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासमोर मराठा समाजातील तरुणांनी घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली आहे. ओबीसी नेत्यांनी मद्य प्राशन केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात येत आहे. तसेच शिवीगाळ केल्याचा देखील आरोप यावेळी मराठा तरुणांनी केला आहे. लक्ष्मण हाके यांच्या खांद्याला पकडून मराठा तरुण त्यांना घेऊन जात आहेत. यादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू होती. लक्ष्मण हाकेंचे मेडिकल चेकअप करण्याची मागणीही मराठा तरुणांनी केली आहे. यानंतर लक्ष्मण हाके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी समाजासाठी लढा देणारे नेते असे कसे? असा सवाल मराठा कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. हाके यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिस ठाण्यात तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे. लक्ष्मण हाके यांच्या खांद्याला पकडून मराठा तरुण त्यांना घेऊन जात आहेत. यादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू होती. लक्ष्मण हाकेंचे मेडिकल चेकअप करण्याची मागणीही मराठा तरुणांनी केली आहे. यानंतर लक्ष्मण हाके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाके म्हणाले, मी मोटारसायकल वरून येत असताना लोकांनी मानगुटीला पकडून माझा व्हिडीओ केला. दोन तरुण पाच वाजल्यापासून माझ्या पाळतीवर होते. त्यातला एक तरूण मला बोलूनही गेला. त्यांचे जर म्हणणे असेल की मी कोणत्या हॉटेलमध्ये गेलो, मी कुठे मद्यपान केले तर त्यांनी मला तसे व्हिडीओ फुटेज दाखवावे, असे ते म्हणाले आहेत. तसेच वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी मराठा तरुणांनी केली होती, यावर लक्ष्मण हाके यांनी माझी काहीही हरकत नसल्याचे म्हणले आहे.