मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण:संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांची आघाडी; छत्रपती संभाजीराजे म्हणाले- जनतेला नवा पर्याय देणार

मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण:संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांची आघाडी; छत्रपती संभाजीराजे म्हणाले- जनतेला नवा पर्याय देणार

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत राज्यातील राजकारणातील हालचालींना वेग आलेला आहे. आता महाराष्ट्रातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. यात छत्रपती संभाजीराजे भोसले आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देणार असून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणाच छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल करणार-संभाजीराजे मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या 75 वर्षात नुसते हेवेदावे सुरू आहे. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचं काम करतो. सध्या लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला, त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मागील 15-20 दिवसांत जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय घेऊन समोर येत आहोत. ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेन आमचा प्रवास सुरू झाला आहे. नवा पर्याय लोकांसमोर देणार-संभाजीराजे संभाजीराजे म्हणाले- निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत, पुढची तारीख अजून जाहीर झाली नाही. जितके चांगले लोक आम्हाला जोडले जातील त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेतायेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत. प्रहारसोबतही बोलणी सुरू ते पुढे बोलतांना म्हणाले की, प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबतही आमची बोलणी सुरू आहेत. काही मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी आणखी 2 बैठका घ्याव्या लागतील. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरत्न आंबेडकर आमच्यासोबत आलेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुढे जायचे आहे. जय जवान, जय किसान पक्ष आमच्यासोबत आला आहे. ही चांगली सुरुवात आहे. जरांगे सकारात्मक भूमिका घेतील अशी अपेक्षा राजू शेट्टींसोबतही आमचे बोलणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सगळे घटक कसे येतील, वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली. आपल्याला पाडायचं नाही तर निवडून कसं आणता येईल यावर बोलणं झालं. त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे. गरीब मराठ्यांनाही आरक्षण मिळावं, ही आमची भूमिका आहे. जरांगे सकारात्मक निर्णय घेतील ही अपेक्षा आहे, असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं. महाराष्ट्रात नळावरची भांडणे सुरू आहेत-राजरत्न आंबेडकर या नवीन समीकरणावर राजरत्न आंबेडकर म्हणाले की, आज जे काही महाराष्ट्रात बघत आहोत, बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर लहानपणी ते चाळीत राहायचे, रात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत ते अभ्यास करत होते. कारण 5 वाजता पाणी यायचे, तेव्हा नळावरची भांडणे सुरू व्हायची. त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. आज महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. नळावरची भांडणे सुरू आहेत. जोडेमारो आंदोलन, वैयक्तिक द्वेषातून हे सगळे सुरू आहे. आंबेडकर पुढे म्हणाले की, लोकसभेत संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला गेला, भारताचे संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले. परंतु ज्यावेळी खरेच जेव्हा संविधानाला धोका आहे, मग वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुणीही एक प्रश्न विचारत नाही. अनुसूचित जातीतील, मुस्लीम समाजाला आज त्यांची फसवणूक झालीय असं वाटायला लागलं आहे. महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणि मविआ हटवायचे असेल तर महायुती आणा हा जो खेळ सुरू आहे तो थांबला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला एक पर्याय म्हणून नवीन समीकरण पुढे येत आहे.

​महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत राज्यातील राजकारणातील हालचालींना वेग आलेला आहे. आता महाराष्ट्रातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. यात छत्रपती संभाजीराजे भोसले आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देणार असून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणाच छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल करणार-संभाजीराजे मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या 75 वर्षात नुसते हेवेदावे सुरू आहे. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचं काम करतो. सध्या लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला, त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मागील 15-20 दिवसांत जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय घेऊन समोर येत आहोत. ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेन आमचा प्रवास सुरू झाला आहे. नवा पर्याय लोकांसमोर देणार-संभाजीराजे संभाजीराजे म्हणाले- निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत, पुढची तारीख अजून जाहीर झाली नाही. जितके चांगले लोक आम्हाला जोडले जातील त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेतायेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत. प्रहारसोबतही बोलणी सुरू ते पुढे बोलतांना म्हणाले की, प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबतही आमची बोलणी सुरू आहेत. काही मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी आणखी 2 बैठका घ्याव्या लागतील. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरत्न आंबेडकर आमच्यासोबत आलेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुढे जायचे आहे. जय जवान, जय किसान पक्ष आमच्यासोबत आला आहे. ही चांगली सुरुवात आहे. जरांगे सकारात्मक भूमिका घेतील अशी अपेक्षा राजू शेट्टींसोबतही आमचे बोलणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सगळे घटक कसे येतील, वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली. आपल्याला पाडायचं नाही तर निवडून कसं आणता येईल यावर बोलणं झालं. त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे. गरीब मराठ्यांनाही आरक्षण मिळावं, ही आमची भूमिका आहे. जरांगे सकारात्मक निर्णय घेतील ही अपेक्षा आहे, असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं. महाराष्ट्रात नळावरची भांडणे सुरू आहेत-राजरत्न आंबेडकर या नवीन समीकरणावर राजरत्न आंबेडकर म्हणाले की, आज जे काही महाराष्ट्रात बघत आहोत, बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर लहानपणी ते चाळीत राहायचे, रात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत ते अभ्यास करत होते. कारण 5 वाजता पाणी यायचे, तेव्हा नळावरची भांडणे सुरू व्हायची. त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. आज महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. नळावरची भांडणे सुरू आहेत. जोडेमारो आंदोलन, वैयक्तिक द्वेषातून हे सगळे सुरू आहे. आंबेडकर पुढे म्हणाले की, लोकसभेत संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला गेला, भारताचे संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले. परंतु ज्यावेळी खरेच जेव्हा संविधानाला धोका आहे, मग वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुणीही एक प्रश्न विचारत नाही. अनुसूचित जातीतील, मुस्लीम समाजाला आज त्यांची फसवणूक झालीय असं वाटायला लागलं आहे. महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणि मविआ हटवायचे असेल तर महायुती आणा हा जो खेळ सुरू आहे तो थांबला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला एक पर्याय म्हणून नवीन समीकरण पुढे येत आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment