अहमदनगर : भाजपच्या ‘मिशन ४५’ या अभियानंतर्गत राज्यातील ४५ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. केंद्रिय मंत्री आणि अन्य नेत्यांवर एकएका मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचे दौरे सुरू असले तरी या अभियानाला गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर आणखी वेग येणार आहे. राज्यातील १८ लोकसभा मतदारसंघ असे आहेत, की तेथे भाजपने कधीही निवडणूक लढवलेली नाही. अशा मतदारसंघांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले असून गुजरात निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या भागांत दौरे करणार आहेत.

भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेचे राज्य संयोजक, माजी मंत्री संजय भेगडे यांनी ही योजना सांगितली आहे. भेगडे यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या योजनेची माहिती दिली आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या शिर्डी मतदारसंघातही पुढील निवडणूक भाजप कमळ या चिन्हावर लढवणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. शिर्डीत झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार चंद्रशेखर भाऊ कदम, बाळासाहेब मुरकुटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर उपस्थित होते.

Sanjay Raut: संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या ईडीच्या प्रयत्नांना धक्का, सुनावणीस हायकोर्टाचा नकार

यावेळी भेगडे म्हणाले, देशातील काही मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रात जे मतदारसंघ भाजपने कधीच लढवले नाहीत, असे १८ मतदारसंघ आहेत. गुजरातच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दौरा या मतदारसंघांत होणार आहे. शिर्डीलाही ते येणार आहेत. जलजीवन मंत्री प्रल्हादसिंह पटेल शिर्डी मतदारसंघाचे प्रभारी आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात १ हजार कोटींपेक्षा जास्त निधीची कामे सुरू आहेत. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होईल, असेही भेगडे म्हणाले.

शिंदे नेमका कोणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला चाललेत? अजित पवारांचा खोचक सवाल

दरम्यान, यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मागील दौऱ्याचे अनुभव कथन केले. शिर्डी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांचे हस्ते भेगडे यांचा सत्कार करण्यात आला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *