मोठी बातमी:राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे येथून अटक; तपासाला अधिक वेग येणार
राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे येथून अटक करण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अनेक दिवसापासून या प्रकरणातील आरोपी असलेल्या बियाणी कुटुंबिय पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अभिषेक बियाणी याला आता बीडला घेऊन जाणार असून या प्रकरणातील तपासाला अधिक वेग येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड मधील ज्ञानदारा मल्टीस्टेट प्रकरण ताजे असतानाच राजस्थान मल्टीस्टेट घोटाळ्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी लातूर, परळी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. बीड मधील अनेक गुंतवणूकदाराचे पैसे या बँकांमध्ये अडकले आहेत. ठेवी अडकल्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांना देखील पुण्यातून अटक झाली होती. दरम्यान आता राजस्थानी मल्टीस्टेट संदर्भात पुण्यातून अभिषेक बियाणी याला अटक झाली आहे. चंदूलाल बियाणीसह 17 संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा राजस्थानी मल्टिस्टेटच्या ठेवीदारांची 7 कोटी 53 लाख 29 हजार 968 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्था अध्यक्ष चंदूलाल बियाणीसह 17 संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मल्टिस्टेटच्या सर्व शाखा बंद होत्या. अध्यक्षासह अनेक संचालक गायब असल्याने ठेवीदार आक्रमक झाले होते. 250 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या मल्टिस्टेटमध्ये गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी आंदोलन केले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या संचालकांवरही गुन्हा राजस्थानी मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, संचालक बालचंद्र लोढा, अभिषेक बियाणी, बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय लढ्ढा, अशोक जाजू, सतीश सारडा, प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेव रोडे, जगदीश बियाणी, व्ही. बी. कुलकर्णी, कांबळे, तुषार गायकवाड, प्रदीप मुरकुटे, राजेश मोदानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.