मुंबई: राज्यात काही भागात पुन्हा पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, पुढील काही दिवस राज्यात पाऊस असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, पुढील ३ दिवस मुंबईत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील तर शुक्रवार शनिवारपर्यंत पावसाचा जोर हळूहळू वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्याशिवाय, बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ते ओडिशा आणि उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता हवामान विओभागाने वर्तवली आहे.
मुंबईत पुढील तीन दिवस तुरळक सरी कोसळतील. १५-१६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळूहळू वाढेल. १७ ते १९ सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र (LPA/UAC) मुंबईकडे सरकल्यामुळे मुंबईत खूप मुसळधार पाऊस पडू शकतो. जसजसे आम्ही तारखांच्या जवळ जाऊ तसतसे अधिक अपडेट मिळतील.
मुंबईत पुढील तीन दिवस तुरळक सरी कोसळतील. १५-१६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळूहळू वाढेल. १७ ते १९ सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र (LPA/UAC) मुंबईकडे सरकल्यामुळे मुंबईत खूप मुसळधार पाऊस पडू शकतो. जसजसे आम्ही तारखांच्या जवळ जाऊ तसतसे अधिक अपडेट मिळतील.
१३-१४ सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल ज्यामुळे पुढील ५ दिवस पूर्व भारत विशेषतः ओडिशामध्ये पाऊस पडेल. त्यानंतर १५ सप्टेंबरपासून विदर्भ आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील काही दिवस राज्यात पाऊस बरसणार
१४ सप्टेंबरपर्यंत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभाग, विदर्भाचा काही भाग येथे पाऊस पडू शकतो. २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे.