मुंबई :एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल, खार आणि शारदाश्रम विद्यामंदिर, दादर संघांनी मोठे विजय मिळवले. रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूलने १६ वर्षांखालील लीग सामन्यात सेंट फ्रान्सिस डीअॅसिसी हायस्कूल, बोरिवली संघावर २९७ धावांनी मात केली.

मीत पटेलचे (६५ चेंडूत १२३ धावा) धडाकेबाज शतक आणि कर्णधार देवांश रायच्या (७४ चेंडूत ९६ धावा) शानदार खेळीच्या जोरावर रिझवीने ३४८ धावांची मजल मारली. कर्णधार देवांशने (३-४) गोलंदाजीतही हात अजमावताना सेंट फ्रान्सिस डीअॅसिसीला ५१ धावांवर बाद केले. दुसरीकडे शारदाश्रम विद्यामंदिर शाळेने विबग्योर हायस्कूल, मालाड या शाळेचा डाव ९६ धावांत आटोपला. त्यानंतर फक्त १०.१ षटकांत त्यांनी विजय साकारल. यावेळी शारदाश्रम विद्यामंदिर शाळेकडून वरद रामदासने १४ धावांत तीन बळी मिळवले आणि तोच यावेळी सामनावीर ठरला.

संक्षिप्तधावफलक :

१६ वर्षांखालील मुले – 1. रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल, खार – 38.3 षटकांत सर्वबाद 348(मीत पटेल 123, देवांश राय 96; इम्रान खान 3-54) विजयी वि. सेंट फ्रान्सिस डीअॅसिसी हायस्कूल, बोरिवली – 19 षटकांत सर्वबाद 51(देवांश राय 3-4). सामनावीर: देवांश राय.

2. विबग्योर हायस्कूल, मालाड – 28.2 षटकांत 9 बाद 96(इशान मालवीय 32; वरद धर्मेंद्र रामदास 3-14) पराभूत वि. शारदाश्रम विद्यामंदिर, दादर – 10.1 षटकांत 3 बाद 100(अक्षय चिंचवडकर 35; अक्षय भिसे 27). सामनावीर: वरद धर्मेंद्र रामदास

3. आरएम भट हायस्कूल, परळ – 21.2 षटकांत सर्वबाद 82(अथर्व पाटील 5-11) पराभूत वि. राजा शिवाजी विद्यालय, दादर -14.3 षटकांत 6 बाद 83(अथर्व पाटील 42*). सामनावीर: अथर्व पाटील

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

4. रायन इंटरनॅशनल सीबीएसई, मालाड – 35 षटकांत 6 बाद 277(कियान तन्ना 61, अरन अग्रवाल 45, 65 पेनल्टी धावा) विजयी वि. एसएम शेट्टी हायस्कूल, पवई – 39.3 षटकांत सर्वबाद 263(दर्शिल शेजवळ 53, पार्थ शेट्टी 43, हृषिकेश विश्वकर्मा 40; आदित्य गुडेकर 4-45). सामनावीर : आदित्य गुडेकरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *