सातारा : कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेत आलं तर ५०० रुपयात सिलेंडर देण्याचे आश्वासन देत असल्याचं सांगितले आहे.

दरम्यान, २०१४ पासून महाराष्ट्रात भाजपची सत्ता असून मुख्यमंत्र्यांनी देखील याचा विचार करून १८ नोव्हेंबर रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि दिवाळीनिमित्ताने सर्व महाराष्ट्रवासीयांना ५०० रुपयात सिलेंडर उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.

निराधार वयस्कर दांम्पत्याची दिवाळी फराळा विनाच; धाराशिवमधील वृद्ध जोडपं मुलांच्या आधाराच्या प्रतिक्षेत

याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपण मांडीला मांडी लावून बसला आहात, ते आता किती क्लीन आहेत हे आपण दाखवले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी देखील यामध्ये लक्ष घालून ५०० रुपयात सिलेंडर महाराष्ट्रातील जनतेला उपलब्ध करावा अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

छत्तीसगडमध्ये भाजपकडून मोठ्या घोषणा

छत्तीसगडमध्ये भाजपने नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध केला. छत्तीसगड विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. बेराजगार युवक आणि महिलांसाठी सवलतींची खैरात करण्यात आली आहे. यामध्ये विवाहित महिलांना दरवर्षी १२ हजार रुपये आणि अवघ्या ५०० रुपयांत गॅस सिलेंडर देण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.

मुंब्य्रात ठाकरे-शिंदे वाद चिघळला, उद्धव ठाकरे भेट देणार; शाखेबाहेर मोठा बंदोबस्त

Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *