धुळे: शिंदे गट आणि भाजप सत्तेत एकत्र आहेत आणि हीच राज्यातली अधिकृत शिवसेना-भाजपची युती आहे, असं दोन्ही पक्षांकडून सांगितलं जातंय.. पण, ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र वेगळंच चित्र समोर आलंय. धुळे जिल्ह्यात भाजपच्या एका आमदाराने ठाकरे गट असो की शिंदो गट, दोन्ही गटांचा सुपडासाफ केलाय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तर इथे फक्त एका एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावं लागलंय. जिथे शिंदे गट अधिकृत शिवसेना असल्याचा दावा केला जातो, तिथे भाजपच्याच आमदाराने त्यांना चितपट करत स्थानिक समीकरण मोडित काढलंय. धुळे जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यापैकी ३१ ग्रामपंचायतींवर भाजपचं म्हणजे पर्यायानं अमरिश पटेल याचं वर्चस्व कायम आहे. याच निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेसला १ तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाला तिथं खातंही उघडता आलं नाही.

शिरपूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून आमदार अमरिश पटेल यांची एक हाती सत्ता आहे. त्यांच्या शिरपूर या बालेकिल्ल्यात त्यांच्या विरोधात कुठल्याही पक्षाला आपली जागा टिकवता आली नाही. एकावेळी कायम काँग्रेसचे वर्चस्व म्हणून शिरपूर तालुका ओळखला जायचा. परंतु, अमरिश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि हा भाजपचा बालेकिल्ला बनला. ३३ ग्रामपंचायतीपैकी काँग्रेसला जोयिदा ग्रामपंचायतीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोहिदा ग्रामपंचायतीवर समाधान मानावं लागलं. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गट आणि ठाकरे गटाने शिवसेनेवर दावा करत निवडणुका लढवल्या खऱ्या मात्र दोघांनाही शिरपूर तालुक्यात खातंही उघडता आलं नाही.

आयकर आयुक्त बनून उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे गेला, मागणी ऐकून अधिकारीही चक्रावला…

अमरिश पटेल कोण?

अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे नेते असून सध्या भाजपमध्ये आहेत.त्यांची राजकारणाची सुरुवात शिरपूर तालुक्यातून झाली. १९८५ ला ते शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले. १९९० ते २००५ पर्यंत कॉंग्रेसकडून चार वेळा शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २००३ ते २००४ या कालावधीत शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. २००९ आणि २०१५ ला धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले. २०१९ ला अमरिश पटेल यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवत २०२० मध्ये भाजपकडून विजयी झाले.

फक्त एक चेंडू… भारताच्या पराभवासाठी नेमका कोणता ठरला टर्निंग पॉइंट, जाणून घ्या…

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातील कुणाला संधी मिळणार याची चर्चा आहे. यातच आता आमदार अमरिश पटेल यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शिरपूर तालुक्यात इतर पक्षांना आणखी बळ लावावं लागणार असलं तरी ग्रामपंचायतीच्या निकालानंतर शिरपूर तालुक्यात भाजपची सरशी असून अमरिश पटेल यांनी त्यांचं वर्चस्व कायम ठेवलंय.

दरम्यान, शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना असल्याचं भाजपकडूनही सांगितलं जातं. पण, त्यांचाही ग्रामपंचायत निवडणुकीत सुपडासाफ करण्यात भाजपला यश आलंय. कारण, ज्या ३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली, त्यात बहुतांश ठिकाणी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून निवडणूक लढवण्यात आली. ही निवडणूक जरी थेट पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी उमेदवार हे पक्षाचे समर्थक असतात आणि त्याचा फायदा थेट पक्षाला होत असतो. धुळे जिल्ह्यात मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटाची कोंडी एकट्या अमरिश पटेल यांनीच केली.

भारतावर २०८ धावा करूनही पराभवाची नामुष्की, मॅथ्यू वेडने साकारली झंझावाती खेळीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.