[ad_1]

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून दररोज दुचाकीचा एखादा अपघात होताना दिसत आहे. त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. मागील चार दिवसांमध्ये पाच जणांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात दुसरबीड बस स्थानकावर रस्ता अपघातात एका युवा डॉक्टरला मृत्यूने गाठले आहे. घरापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर डॉक्टरचा मृत्यू झाला. ते भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाचे सुपुत्र होते.

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील रहिवासी डॉ. प्रशांत प्रभाकर ताठे यांचा नऊ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास अपघात झाला. ट्रक व दुचाकी यांच्या धडकेत डॉक्टर गंभीर जखमी झाले होते, मात्र जालना येथे उपचारादरम्यान काल रात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अडगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत डॉ . प्रशांत प्रभाकर ताठे (वय ३६ वर्ष) हे अडगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रातून परत घरी येत असताना दुसरबीड बस स्थानकावर एका ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. रस्त्यावर पडून ते जबर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जालना येथे हलविण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत डॉक्टारांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली.

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. युवा डॉक्टर ताठे त्यांच्या मृत्यूची बातमी दुसरबीड परिसरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली. दहा ऑगस्ट रोजी मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शाळेत पोरं भांडली, बाहेर पालक भिडले; कोल्हापुरात राडा, मारामारीत एकाचा मृत्यू

अपघातास काय कारणीभूत ठरले?

सिंदखेडराजा ते मेहकर मार्गावर अनेक दिवसांपासून वाढत्या अतिक्रमणामुळे अपघात होत आहे. आणि त्यात आज एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ट्रकला पास करताना दुसरे वाहन रस्त्यावरच उभे असल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. येथून गेलेला महामार्ग अतिक्रमणच्या विळखात असल्याने अपघात वाढतच आहेत.

पुण्यात कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ विचित्र अपघात, वाहनं एकमेकांना धडकली, एकाचा मृत्यू
गावाच्या पूर्व पश्चिमेस दोन किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेल्या अतिक्रमणांनी दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असते. एखादा छोटा अपघात झाला किंवा रस्त्यात वाहन बंद पडले. की तासभर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन याबाबत कठोर भूमिका घेत पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्य रस्ते विभागाने यापूर्वी पुढाकार घेत दोन्ही बाजूने 40 फूट अतिक्रमण काढले होते. पण पुन्हा काही दिवसात जैसे थे परिस्थिती होत असते. त्यामुळे आता तरी प्रशासनाने जागी होत कायमस्वरूपी यावर तोडगा काढावा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

तुझी सोनसाखळी कुठेय? व्हिडिओ कॉलवर अमित शाहूशी वाद, भाजपच्या महिला नेत्यासोबत घातपात

फक्त काही अंतर राहिले होते घर गाठायला

डॉक्टर ताठे यांचे घर फक्त तीनशे मीटर लांब असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने या घटनेमुळे दुसरबीडसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात झाल्यानंतर गंभीर अवस्थेत डॉक्टर ताठे यांना डॉक्टर शिंदे यांच्या प्राथमिक उपचार करून जालना येथे रेफर करण्यात आले होते परंतु उशिरा रात्री त्यांचा मृत्यू झाला. बस स्थानकाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना बाजूला उभे असलेल्या टेम्पोला धक्का लागून नंतर ट्रकवर धडकून हा विचित्र अपघात झाला. त्यामुळे रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणात याला कारणीभूत असल्याचे चर्चा आहे.

चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *