नंदुरबार: महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण ही तोरणमाळची ओळख आहे. परंतु त्यापलीकडे निसर्गसौंदर्य, इतिहास, आदिवासी संस्कृती, निसर्गोपचारासह साहसी क्रिडा पर्यटन यासारख्या विवैध्यपूर्ण पर्यटनाच्या येथे मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. मात्र समारोपदरम्यान जय राष्ट्रवादी बोलून भाषण संपवल्याने त्यांच्या या जे राष्ट्रवादीच्या नाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
शिंदे-ठाकरे गटात वाद पेटणार? ठाकरे गटाशी संबंधित बांधकामांवर कारवाईची शिंदे गटाची मागणी
येणाऱ्या निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी देखील चर्चा आता जिल्हाभरात रंगू लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी गावित बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, तोरणमाळ या पर्यटन तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून पूर्वीपासूनच शासनाचे प्रयत्न राहिले आहेत आणि आता विद्यमान स्थितीत देखील या दुर्गम भागातील बचत गटांना त्याच दृष्टिकोनातून प्रोत्साहन देणे सुरू आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रस्ते जोड योजना राबवणार आहे.

ते पुढे म्हणाले की, तोरणमाळ पासून ते शेवटच्या टोकावरील भादल गावापर्यंत वीज पोहोचावी म्हणून ३३ केवी उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर तोरणमाळ भागातील विविध विकास कामांसाठी ४०० कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी २०० कोटी रुपये येत्या काही दिवसात प्राप्त होतील आणि त्यातून विविध कामे सुरू झालेली दिसतील, अशी माहिती देऊन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी तोरणमाळच्या पर्यटन विकासाला भरभक्काम चालना देणार असल्याची ग्वाही दिली.

अजित पवारांच्या घराबाहेर निदर्शन केलं, शासनाच्या आश्वासनानंतर धनगर बांधवांचं आंदोलन १३ दिवसांनंतर मागे!

परंतु मंत्री गावित यांनी भाषण संपवताना जय राष्ट्रवादी असा नारा दिला. त्यानंतर ही चर्चा जिल्हाभरात रंगू लागली आहे. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात आयात झालेले भाजपाचे आमदार तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत. त्यांची कन्या डॉक्टर हिना गावित यादेखील नंदुरबार भाजपा खासदार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत डॉक्टर गावित हे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे चित्र आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *