पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (nirmala sitharaman) या बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. सितारामन यांच्या या दौऱ्याकडे अवघ्या महाराष्ट्रच लक्ष लागून राहीले आहे. पवारांच्या बारामतीला खिंडार पाडण्यासाठी आता मिशन बारामती भारतीय जनता पार्टीने हाती घेतल्याची चर्चा महाराष्ट्रमध्ये सुरू झाली आहे. अर्थात यासाठी बातारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अर्थमंत्र्यांचे स्वागत केले आहे. आज (मंगळवारी) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणल्या जर अर्थमंत्र्यांना वेळ असेल तर मी स्वतः त्यांना बारामतीचे विकास काम पाहण्यासाठी सोबत घेऊन जाईन.

कर्जत जमखेडचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी अर्थ मंत्रांच्या दौऱ्यावर संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळेस राम शिंदे जिंकण्यावर निर्धार केला. आम्ही अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल राम शिंदे यांनी केला आहे. त्याचसोबत बारामती विकास झालेलाच नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केलाय.

वाचा- डेंग्यूमुळे बारामतीच्या महिला पोलिसाचा मृत्यू; अनाथ झाले १० दिवसाचे बाळ

बारामती तालुक्यात अजून चाळीस गाव पिण्याच्या पाण्यापासून दूर आहेत, जलयुक्त शिवारमूळे थोडाफार दिलासा त्या तालुक्यात मिळाला आहे. सिंचनाखाली क्षेत्र येणे आवश्यक आहे, रस्त्यांचे देखील अतिशय वाईट अवस्था आहे. यामुळे ते जो विकासाचा दावा करत आहेत तो सपशेल फेल ठरलेला आहे, असा घणाघाती आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

वाचा- भारत आणि पाकिस्तान यांची आज मॅच; दोघांना कोणत्याही परिस्थितीत हवाय विजय, फक्त…

याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणल्या, तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सीताराम बारामती आल्या नंतर बारामतीमध्ये अनेक संस्था आहेत ज्या त्यांनी पाहाव्यात त्यासाठी माझी ही त्यांना विनंती असेल की, कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पाहव्यात यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आलय. जर सितारामन वेळ असेल तर मी फिरून त्यांना बारामती दाखवेन.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.