भाजप आमदार नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या:आणखी एक एफआयआर दाखल; मुस्लिमांना मारण्याचा दिला होता इशारा
अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या भाषणात मुस्लिमांना लक्ष्य केल्याप्रकरणी बीड जिल्हा पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितीश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता या एफआयआरसह, राज्यात आमदार राणे यांच्या विरुद्ध असे चार गुन्हे दाखल झाले आहेत. या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांनी राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राणे यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या 300 हून अधिक लोकांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली होती. नितीश राणे यांनी 1 सप्टेंबर रोजी हिंदू संत महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि तोफखाना भागात दोन जाहीर सभांना संबोधित केले होते. इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे महंत रामगिरी महाराज हे गेल्या महिन्यात चर्चेत आले होते. महाराजांना धक्का लागला तरी त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला होता. नितेश राणेंवर कोणत्या कलमांखाली एफआयआर दाखल? बीड जिल्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 302 (धार्मिक भावना भडकावणे), 351-2 (गुन्हेगारी धमकावणे) आणि 353-2 (सार्वजनिक गैरप्रकारांना प्रोत्साहन देणारी वक्तव्ये) अंतर्गत ‘शून्य एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. नोंदणीकृत पुढील तपासासाठी हे प्रकरण अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. या आधी नितीश राणे यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना आणि श्रीरामपूर पोलिस ठाण्यात कथित द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पोलिसांनीही मंगळवारी राणेंवर गुन्हा दाखल केला होता. नितेश राणेंच्या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अजितदादांनी श्रेय घेतले, राज्य मंत्रिमंडळात खडाजंगी:तर फडणवीसांची एसओपी आणण्याची तयारी; लाडक्या बहीणीवरुन महायुतीतील वाद आला समोर राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या श्रेय वादावरून महायुती मध्ये चांगलेच वाक् युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचे श्रेय एकटेच घेत आहेत, असा आरोप इतर पक्षातील मंत्र्यांनी केला आहे. त्यावर आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एसओपी आणू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना शांत केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पूर्ण बातमी वाचा… शरद पवार यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलला:त्यांना काँग्रेसची साथ सोडण्याचे सांगितले होते; कदम यांचा मोठा दावा एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार गुवाहाटी येथे गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची साथ सोडावी, सर्व आमदारांना दोन तासात परत आणतो, असा शब्द मी त्यांना दिला होता. उद्धव ठाकरेंचा तसा विचार देखील झाला होता. मात्र, शरद पवार यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलला. आणि आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे सांगितले. असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. दापोली मध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा… दिशाभूल केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल:संभाजीनगर मधील युवकाची शासनाची बदनामी केल्याची तक्रार शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मयत शेतकऱ्यांचे वारस, नातेवाईक, शेतकरी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या गोरगरीब महिला, यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून नैराश येईल आणि त्यांनी शासनाविरोध उठाव करावा, तसेच शासनाविरोधात खोटे आंदोलन उभे राहावे, यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पोस्टवरून त्यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…. लोअर परळ परिसरातील कमला मिल टाईम्स टॉवरला भीषण आग:अनधिकृत बांधकामांमुळे अशा घटना घडत असल्याचा मनसेचा आरोप उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाईम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. सकाळी साडेसहा वाजता टाईम्स टॉवरला आग लागल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्ण बातमी वाचा…