भाजप, शिंदेसेनेची घराणेशाही; 25 आमदार विधानसभेमध्ये:शिंदेसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ पराभूत
घराणेशाहीवरून सातत्याने विरोधकांवर प्रहार करणाऱ्या भाजप आणि शिंदेसेनेच्या घराणेशाहीला विधानसभा निवडणुकीत जनमताचा कौल मिळाला आहे. सर्वच पक्षांमध्ये राजकीय वारसा चालवणारी कुटुंबे आहेत. घराणेशाहीतील सर्वपक्षीय २५ नवनिर्वाचित आमदार आता विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यात विनोद शेलार, सत्यजित देशमुख, किरण सामंत, संजना जाधव, विलास भुमरे, नीलेश व नितेश राणे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार, रोहित पाटील आदी विजयी झाले आहेत. दरम्यान, शिंदेसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ पराभूत झाले. अपवाद वगळता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील घराणेशाहीला नाकारले आहे. पवारांचे नातू युगेंद्र, अनिल देशमुखांचे पुत्र सलील, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे चिरंजीव धीरज देशमुख यांच्यासह प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या राजपुत्र अमित ठाकरेंना पराभवाचे तोंड पाहावे लागले. राष्ट्रवादीतील घराणेशाही नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक.
पराभूत : युगेंद्र पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम शिंदेसेना घराणेशाहीतील विजयी
उदय सामंतांचे बंधू किरण सामंत, खासदार संदिपान भुमरेंचे पुत्र विलास, रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव, खासदार नारायण राणे पुत्र नितेश, अनिल बाबर यांचे पुत्र सुहास, रामदास कदम यांचे पुत्र योगेश. उद्धवसेनेतील विजयी
उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत.
पराभूत : प्रशांत हिरेंचे चिरंजीव अद्वय हिरे. हे घराणेशाहीतील दिग्गज पराभूत
राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे, रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश, बविआच्या हितेंद्र ठाकुरांचे पुत्र क्षीतिज, मंत्री विजयकुमार गावितांच्या कन्या डॉ. हिना गावित, माजी मंत्री रणजित देशमुखांचे पुत्र अमोल, मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव झाल्याने अनेकांना धक्का बसला. भाजपमधील विजयी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे नातू संभाजी, रावसाहेब दानवेंचे चिरंजीव संतोष, खासदार नारायण राणेंंचे चिरंजीव , नीलेश, शिवाजीराव देशमुखांचे पुत्र सत्यजित, पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश, माजी मंत्री रणजित देशमुखांचे पुत्र आशिष, दत्ता मेघे यांचे पुत्र समीर, माजी मंत्री विमलताई मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा, माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचे चिरंजीव विक्रम, धनंजय महाडिकांचे चुलत बंधू अमल, पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा जगजितसिंह हे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील विजयी
रोहित पवार, आर. आर. पाटलांचे पुत्र रोहित, केशरकाकू क्षीरसागर यांचे नातू संदीप हे विजयी झाले. काँग्रेस पक्षातील एकच विजयी
विजयी : विलासराव देशमुखांचे पुत्र अमित देशमुख.
पराभूत : खा. प्रतिभा धानोरकरांचे बंधू प्रवीण काकडे, विलासराव देशमुखांचे पुत्र धीरज, प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर.