महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे वादळ:राज्यातील सर्वात मोठा पक्ष; फडणवीसच मुख्यमंत्री होण्याचा दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे वादळ:राज्यातील सर्वात मोठा पक्ष; फडणवीसच मुख्यमंत्री होण्याचा दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे वादळ दिसून आले. 2014 मध्ये मोदी लाटेत देखील एवढा मोठा विजय भाजपला मिळाला नव्हता. तेवढा विजय या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवला आहे. भाजप राज्यातील एकमेव सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इतर कोणत्याही पक्षाला तीन आकडी आकडा गाढता आलेला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा केला आहे. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने बहुमताचा आकडा केव्हाच पार केला आहे. तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष मिळून देखील 50 आमदारांच्या जवळपास संख्या राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल स्पष्ट होतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सागर बंगला गाढत देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. याबरोबरच राज्यातील भाजपचे सर्वच बडे नेते सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे आता राज्याचे सत्ता केंद्र हे देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान ठरेल, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असा दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाचा विजय हा जनतेने दिलेला कौल आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षावर पूर्ण विश्वास दाखवला असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. ज्या पक्षाच्या जागा जास्त असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. भाजपच्या जागा जास्त येत आहेत हे दिसून येत आहे. आमच्या जवळपास 125 जागा येतील. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले. या दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न विचारला असता प्रविण दरेकर यांनी होय असे उत्तर दिले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment