भाजपने मित्र बनून शिंदे गटाच्या गळ्याला सुरी लावली:फडणवीस, अजितदादा, सीएम शिंदेंच्या विरोधात उमेदवार देणार- बच्चू कडू
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे काही ‘लाड गव्हर्नर’नाहीत आम्ही त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार देणार, असे प्रहारचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यांच्या यावक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पडले, त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर शिंदेंचे 4 खासदार वाढले असते, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तर बीजेपीने मित्र बनून गळ्यावर सुरी लावण्याचे काम केल्याचा आरोप कडू यांनी केला आहे. संजय राऊतांवर टीकास्त्र बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत हे शिवसेनेचे आकाशवाणी केंद्र आहे. ते फक्त ब्रेकिंग देते, अभ्यास काहीच करत नाही. त्यांनी थोडा अभ्यास करायला हवा. दिल्लीत तिसऱ्या पक्षाचे सरकार आहे. तिथे काँग्रेस, भाजप टिकले नाही. अरविंदे केजरीवाल नसते तर कदाचित तिथे भाजपची सत्ता असती. मुख्यमंत्री मागण्याचा विचार करत नाही बच्चू कडू म्हणाले की, आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या नाही. आम्ही दिलेल्या 18 मागण्यापैकी एकाही मागणीवर मुख्यमंत्री विचार केला नाही. त्यांनी आमच्या अर्ध्याजरी मागण्या पूर्ण केल्या असत्या तर मी म्हटलो होतो की माझाही मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला देईल, असे म्हटलो होतो. राज्य सरकारने तोडगा काढावा बच्चू कडू म्हणाले की, मराठा आंदोलनाला ओबीसी आणि मराठा ह्या दोन बाजू उभ्या झाल्या आहेत. दोघांचे समाधान करुन कसे आरक्षण देता येईल याकडे सरकारने पाहिले पाहिजे. राज्य सरकारने यावर व्यवस्थित तोडगा काढला पाहिजे.