मुंबई : २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे असलेली दक्षिण मुंबई लोकसभेची जागा जिंकणे भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक असू शकते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेल्या अंतर्गत सर्वेक्षण आणि आढाव्यात हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईत भाजपला विजय सोपा दिसतो, तर शिंदे गटाकडे असलेल्या दोन जागांबाबत भाजप सावध भूमिकेत आहे.

शुक्रवारी भाजपने राज्यातील सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. आमदारांसमोर त्यांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक मांडण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक जागेवर पक्षाला जिंकण्यास किती वाव आहे, याबद्दल त्यांचा अभिप्राय विचारण्यात आला.

“गेल्या वेळेप्रमाणे लोकसभेच्या ४४ जागा जिंकणे कठीण होईल. जर मुस्लिम मते एकत्रित झाली आणि या समुदायाने धोरणात्मक निर्णय घेत मतदान केले, तर मोठी समस्या उभी राहील, असेही सूत्रांनी सांगितले. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या युतीबाबतही अस्वस्थता आहे.

अजितदादांची भूमिका अमान्य, भाजप नेता शरद पवारांच्या गटात, आता शिष्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी

कोणत्या जागांवर विजय सोपा?

मुंबईत लोकसभेच्या सहा जागांपैकी, उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई भागात भाजप सुरळीतपणे मार्गक्रमण करेल, अशी अपेक्षा पक्षाला आहे. या दोन्ही जागांवर भाजपचेच खासदार आहेत. इतर काही जागांबाबात निवडणुका जवळ येतील, तसे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे धाकधूक?

उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात वांद्रे येते, जिथे खुद्द उद्धव ठाकरे राहतात आणि तिथे मुस्लिम लोकसंख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे कमी मताधिक्याने विजय मिळू शकतो, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

राज ठाकरे आणि माझी परिस्थिती सारखीच, बिचुकले थाटात म्हणाले, मनसे प्रवेशाबद्दलही मोठं वक्तव्य
उत्तर-पश्चिम मुंबईत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत असलेले गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार आहेत. ठाकरे गटासोबत असलेला मुलगा अमोल कीर्तिकर यांना स्वतःचा खासदार निधी वापरुन मतदारसंघातील सर्व कामांचे उद्घाटन करण्यास गजानन कीर्तिकरांनी परवानगी का दिली, हे भाजप कार्यकर्त्यांना समजावून सांगणं कठीण झालं आहे. “आमच्या मतदारांना उत्तर देणे अवघड झाले आहे. मात्र ही जागा भाजपच्या वाट्याला आली तर आम्ही जिंकू शकतो” असे सूत्रांनी सांगितले.

शिंदेंना खुर्ची द्यायला नको, म्हणून ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपदच नाकारलं, कीर्तिकरांचा आरोप
दक्षिण-मध्य मुंबई जागेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवाराची निवड महत्त्वाची आहे. सध्याचे खासदार राहुल शेवाळे हे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उभे ठाकतील, तर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात लढा कठीण होईल, असे सूत्रांनी सांगितले. दक्षिण मुंबईची जागा सर्वात आव्हानात्मक असू शकते. कारण ठाकरेंच्या सेनेचा शिवडी, वरळी आणि नायगावमध्ये मोठा मतदारवर्ग आहे, तर मुंबादेवी विभागात प्रामुख्याने मुस्लिम मतदार आहेत. सध्या अरविंद सावंत येथून खासदार आहेत.

उर्वरित मुंबई महानगर क्षेत्रात, ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव असतानाही पक्षाला सर्व जागा जिंकण्याचा विश्वास आहे. पालघरमध्ये मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील मतभेदांमुळे पक्षाला हानी पोहोचू शकते.

नितेश राणेंचं वक्तव्य बालिशपणाचं, त्यांचा निषेध करतो; भाजप नेते संजय काकडेंची टीका

अजितदादांसोबत युतीने अस्वस्थता

राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती. “चक्की पिसिंग अँड पिसिंग” वरील फडणवीसांचा व्हिडिओ अजूनही चर्चेत आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर अजित पवारांनी नवाब मलिक यांच्या घरी दिलेली भेटही कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे. कारण भाजपने त्यांच्यावर दाऊद इब्राहिमचा मोहरा असल्याचा आरोप केला, असे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादी आणि भाजप हे नेहमीच निवडणुकांमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. अशा परिस्थितीत भाजप-अजित पवार गटाच्या युतीचे स्पष्टीकरण देणे सोपे नाही, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. भाजपचे मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *