विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे मेगा प्लॅनिंग:गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांच्यासह रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे मेगा प्लॅनिंग:गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांच्यासह रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मेगा प्लॅनिंग करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यातील प्रचाराची जबाबदारी पक्षाच्या प्रमुख चार नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. या चार प्रमुख नेत्यांच्या अंगावर विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची जबाबदारी असणार आहे. याच प्रमुख नेत्यांबरोबरच वीस नेत्यांची व्यवस्थापन समिती देखील जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या समितीचे प्रमुख पद देखील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तेच या समितीचे प्रमुख संयोजक असणार आहेत. त्यांच्यासोबत या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजय रहाटकर, प्रवीण दरेकर, अतुल सावे, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश असेल. नितीन गडकरी संपूर्ण राज्य पिंजून काढणार विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपावण्यात आली आहे. गडकरी हे पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा घेण्याची रणनीती भाजपच्या वतीने आखण्यात आली आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी हे संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाची चांगली पकड असलेल्या विदर्भात देखील भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक ठरेल:चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर निशाणा; राहुल गांधी यांच्यावरही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालतात आणि देवेंद्र फडणवीस चालत नाही, यावरूनच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे खरे राजकारण समोर आले असल्याचे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस चौदा कोटी जनतेच्या मनात आहेत. त्यामुळे देवेंद्रजी आणि भाजप सत्तेत आले तर आपली डाळ शिजणार नाही, आपला जातिवाद चालणार नाही, यामुळेच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. फडणवीस पुन्हा आले तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक ठरेल, या भीतीतूनच सुप्रिया सुळे असा आरोप करत असल्याचे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मेगा प्लॅनिंग करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यातील प्रचाराची जबाबदारी पक्षाच्या प्रमुख चार नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. या चार प्रमुख नेत्यांच्या अंगावर विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची जबाबदारी असणार आहे. याच प्रमुख नेत्यांबरोबरच वीस नेत्यांची व्यवस्थापन समिती देखील जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या समितीचे प्रमुख पद देखील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तेच या समितीचे प्रमुख संयोजक असणार आहेत. त्यांच्यासोबत या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजय रहाटकर, प्रवीण दरेकर, अतुल सावे, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश असेल. नितीन गडकरी संपूर्ण राज्य पिंजून काढणार विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपावण्यात आली आहे. गडकरी हे पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा घेण्याची रणनीती भाजपच्या वतीने आखण्यात आली आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी हे संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाची चांगली पकड असलेल्या विदर्भात देखील भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक ठरेल:चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर निशाणा; राहुल गांधी यांच्यावरही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालतात आणि देवेंद्र फडणवीस चालत नाही, यावरूनच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे खरे राजकारण समोर आले असल्याचे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस चौदा कोटी जनतेच्या मनात आहेत. त्यामुळे देवेंद्रजी आणि भाजप सत्तेत आले तर आपली डाळ शिजणार नाही, आपला जातिवाद चालणार नाही, यामुळेच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. फडणवीस पुन्हा आले तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक ठरेल, या भीतीतूनच सुप्रिया सुळे असा आरोप करत असल्याचे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment