भाजपचे मौन पाळून, हातात फलक घेत मविआचा निषेध:काँग्रेसतर्फे एक दिवस अन्नत्याग आंदोलन
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शनिवारी काँग्रेसतर्फे एक दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आल्यानंतर शनिवारी भाजपने मौन धारण करत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या यापूर्वीच्या भूमिकांचा निषेध केला. यासाठी भाजपने हातात फलक घेत मविआच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले. छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्कमध्ये मौन धारण केले होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, विजय अग्रवाल, सिद्धार्त शर्मा, गिरीश जोशी, कृष्णा शर्मा, देवाशिष काकड, रमेश अलकरी, पवन महल्ले, सुमन गावंडे, जान्हवी डोंगरे, आरती घोगलिया आदी होते.