नवी दिल्ली :boAt Stone 135 Launched: boAt ला कमी किंमतीत ऑडिओ प्रोडक्ट्स लाँच करण्यासाठी ओळखले जाते. कंपनी सातत्याने स्वस्त वायरलेस इयरफोन्सला बाजारात सादर करत आहे. आता कंपनीने आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार करत ब्लूटूथ स्पीकरला लाँच केले आहे. कंपनीने boAt Stone 135 नावाने एक शानदार पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर लाँच केला आहे. या स्पीकरची रेंज १० मीटरपर्यंत आहे. म्हणजेच ब्लूटूथशी कनेक्ट करून गाणी ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. विशेष म्हणजे boAt Stone 135 पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरची किंमत देखील खूपच कमी आहे. boAt Stone 135 स्पीकरच्या किंमत व फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: क्रिप्टोकरन्सीसंबंधी ट्विट करणं Elon Musk यांना पडलं महागात, २० हजार अब्ज कोटींचा खटला दाखल

boAt Stone 135 ची किंमत व फीचर्स

boAt Stone 135 ला तुम्ही फक्त ७९९ रुपये इंट्रोडक्टरी किंमतीत खरेदी करू शकता. या शानदार स्पीकर ब्लॅक, बोल्ड ब्लू, सोल्जर ग्रीन आणि स्पेस ग्रे अशा वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. boAt च्या या स्पीकरला तुम्ही Amazon India आणि boAt लाइफस्टाइल स्टोरवरून खरेदी करू शकता. boAt Stone 135 च्ये स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर हे ५ वॉट पोर्टेबल स्पीकर आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन ५.० दिले आहे. याची रेंज १० मीटपर्यंत आहे. पोर्टेबल स्पीकर देखील एक TF कार्ड स्लॉटसह येतो. यामध्ये तुम्ही मायक्रोएसडी कार्ड इन्सर्ट करून गाणी ऐकण्याचा आनंद घेऊ शकता.

वाचा: Father’s Day: वडिलांच्या आरोग्याची घ्या काळजी, गिफ्ट करा १ हजारांच्या बजेटमधील फिटनेस बँड

यात FM रेडिओला थेट स्पीकरच्या माध्यमातून ऐकण्याची देखील सुविधा दिली आहे. boAt Stone 135 चे वैशिष्ट्ये TWS सपोर्ट आहे. याद्वारे दुसऱ्या स्पीकरला कनेक्ट करण्याची सुविधा मिळते. यामुळे स्पष्ट व जोरात साउंडचा अनुभव मिळतो. पोर्टेबल स्पीकरमध्ये एक बॅटरी पॅक दिला आहे. जो ८० टक्के आवाजावर ११ तासांचा प्लेबॅक टाइम ऑफर करतो. boAt च्या या पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहे. स्पीकरला आयपीएक्स४ सर्टिफिकेट मिळाले आहे. म्हणजेच, स्पीकर पाण्यापासून सुरक्षित राहतो.

वाचा: Block spam calls: वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्स-मेसेजला वैतागला? ‘या’ सोप्या टिप्सने मिनिटात दूर होईल समस्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published.