उत्तर काशी: ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्कियारा आणि दांडलगाव दरम्यान बोगद्याचा एक भाग रविवारी सकाळी बांधकामावेळी कोसळला. या घटनेत ३६ कामगार अडकले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा बोगदा चारधाम रस्ता प्रकल्पाचा भाग आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर उत्तर काशी ते यमुनोत्री हे अंतर २६ किलोमीटरने कमी होणार आहे.
‘प्राथमिक अहवालानुसार ४० कामगार अडकल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ‘नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या (एनएचआयडीसीएल) अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार ही संख्या ३६ आहे. ही घटना सकाळी सहा ते सातच्या दरम्यान घडली. पोलिस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या (एसडीआरएफ) कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आहे,’ अशी माहिती उत्तर काशीचे पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी दिली.

‘बोगद्याचा कोसळलेला भाग सुरुवातीपासून सुमारे २०० मीटर आत आहे. आतमध्ये अडकलेल्या कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून तेथे ऑक्सिजन पाइप टाकण्यात आला आहे. या कामगारांसाठी अन्नपदार्थही पाठवले जात आहेत. कामगारांचे प्राण वाचवण्यास प्राधान्य असून, लवकरच त्यांची सुटका केली जाईल,’ असे यदुवंशी म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News